Pune News : पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. नवले पूल हा अपघातांचे केंद्र बनला असून अनेक निष्पापांना प्राण गमवावे लागत आहेत. आता कात्रज चौक ते नवले पूल दरम्यानच्या बाह्यवळण मार्गावर मोटारीच्या धडकेने पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.
अपघातांची मालिका सुरूच
या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पादचारी महिलेचे नाव ललिता विजय बोरा (वय ६५, रा. आंबेगाव बुद्रुक) असे आहे. याबाबत पोलीस कर्मचारी अविनाश रेवे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मोटारचालक अनिरुद्ध खैरनार (रा. डोंबिवली, जि. ठाणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कात्रज चौक ते नवले पूल दरम्यानच्या बाह्यवळण मार्गावरुन बोरा निघाल्या होत्या. आंबेगाव बुद्रुक परिसरात रस्ता ओलांडत असताना भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली. (Pune News) या अपघातात गंभीर जखमी झालेल्या बोरा यांचा मृत्यू झाला. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन देशमुख करत आहेत.
दरम्यान, नवले पूल हा अपघातांचे केंद्र बनला असून, अनेक निष्पापांना प्राण गमवावे लागत आहेत. रस्त्यांची चुकलेली रचना, यासाठी कारणीभूत आहे. (Pune News) तीव्र उतार आणि वळणे एकत्र झाल्याने पुण्यातील नवले पूल अपघातांचे हॉटस्पॉट बनला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : लेखक राजन खान यांच्या मुलाची आत्महत्या
Pune News : पुणे-दौंड रेल्वे मार्गावर विशेष मेगा ब्लॉक ; दोन दिवस अनेक गाड्या रद्द