Pune News : पुणे : अनधिकृत होर्डिंगमुळे शहराचा चेहरा-मोहराच विद्रूप होत असल्याने, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्याचा आदेश देण्यात आला होता. धोकादायक पद्धतीने उभारलेले होर्डिंग जिवघेणे ठरू शकतात, याचा अनुभव देखील पुणे शहराने घेतला. त्यानंतर अनधिकृत होर्डिंग्जवर स्ट्रक्चर ऑडिट करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला. आता या ऑडिटच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे महापालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे.स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी पाच सदस्यांचे पॅनेल
पुणे महानगरपालिकेने शहरातील होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अनेक होर्डिंग कंपन्यांनी एकाच संस्थेने तयार केलेला ऑडिट अहवाल दिला. पुणे महानगरपालिकेला हा प्रकार लक्षात आल्यानंतर मनपाकडे दाखल झालेल्या होर्डिंगच्या ऑडिटवरील विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Pune News) महापालिकने यासाठी तातडीने पावले उचलली. स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी पाच सदस्यांचे पॅनेल तयार करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
याबाबत अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेकडे दाखल केलेले ५० टक्क्यांहून अधिक स्ट्रक्चरल ऑडिट फक्त एकाच संस्थेद्वारे केले जातात. याशिवाय, स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या कंपन्यांची फारच कमी माहिती उपलब्ध आहे. यामुळे पाच जणांची समिती तयार करण्यात आली असून, ते या ऑडिटचे ऑडिट करणार आहेत. ऑडिट अहवाल तयार करताना चुकीची पायंडा वापरला गेला असेल, अशी शक्यता वाटत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे आणि पिंपर-चिंचवड शहरात एकूण २,३०० कायदेशीर होर्डिंग्ज आहेत. शहरात १००० हून अधिक बेकायदेशीर होर्डिंग्ज होते ते काढले गेले आहेत. (Pune News) परंतु यानंतर अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिग्ज आहेत, त्यावर अजून कारवाई झालेली नाही. परंतु आता मनपाने पाच जणांची समिती तयार केल्यामुळे हा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : चोरट्यांची कमाल! दागिन्यांसोबतच कारची चावी चोरून, पार्किंगमधील कारही लांबविली…
Pune News : दिल्लीहून विमानाने पुण्यात येऊन घरफोडी; कोंढव्यात दोघांना अटक; दीड लाखाचे दागिने जप्त