Pune News : पुणे : नेवासा (जि. नगर) तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा पुण्यातील श्रेयस हॉटल येथे रविवारी (ता.११) संपन्न झाला. हा मेळावा नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन डॉ. शिवाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला होता. (A gathering of former students of Jijamata Vidyalaya in Pune)
पुण्यातील हॉटेल श्रेयस येथे झाला मेळावा
यावेळी जिजामाता विद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. शिवाजी घुले, माजी मुख्याध्यापक बन्सी पायघन हे प्रमुख पाहुणे, तर समाजकल्यान विभागाचे अतिरिक्त आयुक्त संजय दाणे, एलआयसीचे मुख्य अधिकारी सुरेश गायकवाड, न्यायधिश दिनकर आरगडे, पुणे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे, प्रमोद जोशी, रंगनाथ हुजरे, किशोर नवले, सोमनाथ नवले, संदीप नवले, खंडू भागवत, सचिन पुरनाळे, (Pune News)सचिन सडेकर, अविनाश खाटील पाटील, मनिषा लगड, कविता काळे, नवनाथ वायकर, कैलास चोपडे, सिद्धार्थ घुले, यशवंत पाटील आदि उपस्थित होते.
जिजामाता विद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. शिवाजी घुले म्हणाले की, गेल्या काही वर्षापूर्वी शेतकरी कुटूंबातील ही सर्व विद्यार्थी एकत्र आली याचा मोठा अभिमान वाटतो. कारण विद्यार्थी दशेत असताना शिक्षक हा शिक्षकाच काम करत असतो. परंतु हे विद्यार्थी मोठे झाल्यानंतर आणि चांगले यश मिळवल्यानंतर चांगले विद्यार्थी घडविल्याचा आनंद वाटतो. (Pune News) आज अनेक विद्यार्थी पुण्यासारख्या शहरात वेगवेगळ्या पदावर आणि वेगवेगळ्या व्यवसायात उल्लेखनीय काम करत आहे. परंतु आजही ही मुले जमीनीवर राहून मोठे होण्याचे स्वप्न उराशी बाळगत आहे. अशी अनेक उदाहरणे आहे. की ज्यांचा आदर्श आपल्याला घेता येईल.
आजही आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शेतकरी कुटूंबातील विद्यार्थ्यांनी घेतलेली भरारीचे एक आदर्श ठेवता येईल. सध्या जे विद्यार्थी शिक्षण घेतात, त्यांनी नक्कीच प्रेरणा घेऊन पुढे जाण्यासाठी प्रयत्न करावेत. काही विद्यार्थ्यांची परिस्थिती आजही हलाकीची आहे. (Pune News) त्यासाठी जिजामाताच्या माजी संघटनाने कर्ज रूपाने मदत करावी. परंतु ती बिनव्याजी करावी. जेणेकरून मोठे झाल्यानंतर संघटनेने उपकार केल्याची भावना निर्माण होऊ नये. कर्ज रूपाने जी काही रक्कम पुन्हा येईल त्यातून इतरांना मदत करून त्याची साखळी तयार करावी.
मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी आपआपली मनोगते व्यक्त केली. यावेळी प्राथमिक शिक्षक व संघटनाचे पदाधिकारी अशोक पंडित यांनी प्रास्तविक व आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : खंडणीसाठी वित्तीय संस्थेतील व्यवस्थापकाचे अपहरण करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या…
Pune News : तुम्ही मंदिरात जाणार असाल तर आता ‘ही’ माहिती हवीच!..