Pune News : पुणे : पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सामान्य जनेतेचे गुन्हेगारांपासून संरक्षण करण्यासाठी नेमलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसानेच महिलेवर बलात्काराचा गंभीर गुन्हा केला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका २४ वर्षीय पिडीतेने तक्रार दिली आहे. या पोलिसासह दुसर्या एका पोलिसावर, महिलेवर आणि २ अनोळखी व्यक्तींवर देखील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बी. टी. कवडे रोडवरील श्रीनाथ कॉम्प्लेक्स आणि आंबेडकर चौकातील डायमंड क्वीन हॉटेल समोर घडली आहे. (Pune News) पोलीस अंमलदार कादीर कलंदर शेख आणि पोलीस अंमलदार समीर पटेल, २ अनोळखी व्यक्ती व एका अनोळखी महिलेविरूद्ध भादंवि कलम ४२०, ३७६, ३९२, ३२३, ५०४, ५०६, ३४ तसेच अनुसूचित जाती/जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम सन १९८९ चे कलम ३ (१) (१२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित गुन्हा सुमारे ३ वर्षांपूर्वीपासून ते १ जुलै २०२३ दरम्यान घडला आहे. हा गुन्हा मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत महिला या अनुसूचित जातीतील आहेत. या महिला आरोपी कादीर कलंदर शेख याच्या परिचयाच्या होत्या. त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्याने त्यांच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. (Pune News) आळंदी येथे जावून लग्न करण्याचा बहाणा देखील केला आणि प्रत्येक वेळी कारणे सांगून लग्न करण्यास टाळाटाळ केली.
दरम्यान, संबंधित महिलेने पुन्हा शेख याला लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने पिडीत महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. १ जून २०२३ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आंबेडकर चौकातील हॉटेल डायमंड क्वीन येथे आरोपी कादीर शेख, समीर पटेल आणि इतरांनी पिडीत महिलेला मारहाण करून, त्यांचाकडील मोबाईल हिसकावून घेतला. (Pune News) या प्रकारानंतर संतप्त महिलेने पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली.
या गुन्हयाचा पुढील तपास हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्याच्या पालकमंत्रीपदी कोणते ‘दादा’ विराजमान होणार?; चर्चांना उधाण!