Pune News : पुणे : पुण्यात दहशतवादाचे जाळे विस्तारल्याची कबुली खद्द पुण्याच्या पालकमंत्र्यांनीच दिल्यानंतर एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईत दहशतवादी शिरले आहेत, अशी माहिती देणारा फोन पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला मंगळवारी सकाळी आला. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन याची माहिती पुणे पोलिसांनी तत्काळ मुंबई पोलिसांना दिली. सायबर पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर हा फोन चक्क अमेरिकेतून आल्याचे निष्पन्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अमेरिकेतून फोन आल्याने खळबळ!
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला आज सकाळी एक फोन आला. मुंबई येथील वरळीच्या एपिक कॅपिटल कार्यालयात दहशतवादी शिरला असल्याची माहिती या फोनवरून देण्यात आली. (Pune News ) एवढे सांगून समोरून फोन कट करण्यात आला. ही माहिती तातडीने मुंबई पोलिसांना देण्यात आली. मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात हा फोन अमेरिकेतून आल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, सॉफ्टवेअरच्या मदतीने असे कॉल स्थानिक पातळीवरुन केले जातात. ही आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल आहे. यामध्ये लोकेशन देखील दुसरे दाखविता येते. (Pune News ) यात तंत्रज्ञानाचा गैरवापर करून फेक काॅल करणाऱ्यांची संख्या वाढत आहेत. हा असाच प्रकार आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : धक्कादायक! अर्धनग्न करुन तरुणाला बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल; दोघांवर गुन्हा दाखल
Pune News : तरुणाला अडवून, कोयत्याचा धाक दाखवून लुबाडले; तिघे पोलिसांच्या ताब्यात