Pune News : पुणे : पुण्यातील राष्ट्रीय कला अकादमी ही संस्था २५ साव्या वर्षात पदार्पण करीत आहे. गणेशोत्सवानिमित्त या संस्थेमार्फत सामाजिक विषयावर रांगोळ्या साकारून पुणेकर नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. मंडई चौक ते अलका टॉकीज चौकादरम्यानच्या ११ चौकांमध्ये सायबर क्राईमवर आधारित सामाजिक विषयांवर रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या. पुणेकरांनी रांगोळ्या पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. यंदाच्या गणेशोत्सवात सुमारे १२५० किलो रांगोळी, ७५० किलो रंग आणि ७०० किलो गुलालाची पुणेकरांनी उधळण केली.
७०० किलो गुलालाची उधळण
राष्ट्रीय कला अकादमीचे संचालक मंदार रांजेकर म्हणाले की, यंदा राष्ट्रीय कला अकादमी संस्था २५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या संपूर्ण काळात प्रत्येक वर्षी सामाजिक विषयावर रांगोळ्या साकारून पुणेकर नागरिकांचे प्रबोधन करण्याच काम केले आहे. (Pune News) या उपक्रमाला पुणेकर नागरिकांनी नेहमीच प्रतिसाद दिला असून यंदा देखील कायम आहे. याबद्दल पुणेकर नागरिकांचे आम्ही आभारी आहोत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हे लक्षात घेऊन यापुढील काळात आर्थिक किंवा अन्य कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून यंदा सायबर क्राईम वर आधारित रांगोळ्या विसर्जन मिरवणूक मार्गावर येणाऱ्या ११ चौकांमध्ये साकारल्याचे त्यांनी सांगितले.
कला अकादमीच्या रांगोळी कलाकारांना गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी जवळपास दोन महिने रांगोळी साकारण्याचे प्रशिक्षण दिले जाते. (Pune News) यामध्ये यंदा ३५० कलाकार सहभागी झाले असून, १२५० किलो रांगोळी, ७५० विविध रंग, ७०० किलो गुलालाचा वापर करण्यात आल्याची माहिती रांजेकर यांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात विसर्जन मार्गावरील दणदणाटाने थरकाप; ओलांडली आवाजाची मर्यादा
Pune News : श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पांचे ८ वाजून ५० मिनीटांनी मोठ्या थाटात विसर्जन…