Pune News : पुणे : शहर आणि परिसरात अंमली पदार्थ विक्रीचे गुन्हे वाढत चालले आहेत. नुकतीच मुंढवा परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. कोकेन, मेफेड्रोनची विक्री करणाऱ्या एका महिलेसह तिघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले आहे. या प्रकरणातील आरोपींकडून पथकाने तब्बल ४६ लाख ५९ हजार रुपयांचे कोकेन, मेफेड्रोन जप्त केले आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सागर कैलास भोसले (वय २६, रा. खराडी), अजितसिंग इंद्रजितसिंग भवानीया (वय ४०, रा. लोहगाव रस्ता), इम्ररीन गॅरी ग्रीन (वय ३७, रा. लोहगाव रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांबाबत अमली पदार्थ विरोधी पथक नेहमीच दक्ष असते. दरम्यान, मुंढवा येथील लोणकर वस्ती भागात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी दोघे येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला त्यांच्या खबऱ्यांकडून मिळाली होती. (Pune News ) या माहितीवरून पाळत ठेवत पोलिसांनी भोसले आणि ग्रीन यांना पकडले. त्यांच्याकडून ४६ लाख ५९ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
दरम्यान, या दोघांची चौकशी केली असता, दोघांनी भवानीया याच्याकडून अमली पदार्थ खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. (Pune News ) या माहितीवरून गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, विशाल दळवी, मारूती पारधी, मनोज साळुंके आदींनी ही कारवाई केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : स्वच्छतेत पुणे स्थानक अनुत्तीर्ण; स्वारगेट, शिवाजीनगर काठावर पास