Pune News : पुणे, ता. ३० : केंद्र सरकारने घरगुती वापरासाठीच्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (एलपीजी) किमतीत २०० रुपयांनी कपात करून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. यामुळे गृहिणींना एकप्रकारे रक्षाबंधनाची भेटच दिली. रक्षाबंधनाच्या दिवशी बुधवार (ता.३० ऑगस्ट) पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. याशिवाय सरकार उज्ज्वला योजनेअंतर्गत ७५ लाख नवीन सिलिंडर जोडणी मोफत देणार आहे.
सर्वसामान्यांना दिलासा
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व लोकांसाठी एलपीजी सिलिंडरची किंमत २०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण ४०० रुपयांचे गॅस अनुदान मिळणार आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना मोठी भेट दिली आहे. देशातील ३३ कोटी जनतेला सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. तर उज्ज्वला योजनेअंतर्गत येणाऱ्या ९.६ कोटी नागरिकांना याचा डबल फायदा होणार आहे. गॅस सिलिंडरच्या या दरकपातीनंतर राज्यात सिलिंडरच्या किमती काय असतील यावर एक नजर टाकूया.
राज्यातील जिल्ह्यांनुसार सिलिंडरच्या किमती?
पुणे – ९०६ रुपये
ठाणे – ९०२.५० रुपये
मुंबई- ९०२.५० रुपये
नागपूर – ९५४.५० रुपये
छत्रपती संभाजीनगर – ९११.५० रुपये
पालघर – ९१४.५० रुपये
परभणी – ९२९ रुपये
रायगड – ९१३.५० रुपये
रत्नागिरी- ९१७.५० रुपये
सांगली – ९०५.५० रुपये
सिंधुदुर्ग – ९१७ रुपये
सोलापूर – ९१८.५० रुपये
वर्धा – ९६३ रुपये
वाशिम – ९२३ रुपये
यवतमाळ – ९४४.५० रुपये
बीड- ९२८.५० रुपये
बुलडाणा – ९१७.५० रुपये
चंद्रपूर – ९५१.५० रुपये
धुळे- ९२३ रुपये
गडचिरोली – ९७२.५० रुपये
गोंदिया – ९७१.५० रुपये
हिंगोली – ९२८.५० रुपये
जळगाव – ९०८.५० रुपये
जालना – ९११.५० रुपये
कोल्हापूर – ९०५.५० रुपये
लातूर – ९२७.५० रुपये
नांदेड – ९२८.५० रुपये
नंदूरबार – ९१५.५० रुपये
नाशिक – ९०६.५० रुपये
धाराशिव – ९२७.५० रुपये
अहमदनगर – ९१६.५० रुपये
अकोला- ९२३ रुपये
अमरावती- ९३६.५० रुपये
भंडारा – ९६३ रुपये