Pune News : पुणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त यंदा १५ ऑगस्ट रोजी राज्यातील विविध तुरुंगातील निम्म्याहून अधिक शिक्षा भोगलेल्या तब्बल १८६ कैद्यांची मुक्तता करण्यात येणार आहे. कैद्यांसाठी हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यदिन ठरणार आहे. या निर्णयामुळे किरकोळ गुन्ह्यांखाली विविध तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षभरात तीन टप्प्यांत शिक्षेत देण्यात आलेल्या विशेष माफीमुळे ५८१ कैद्यांना कारागृहातून सोडण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यानुसार मंगळवारी (१५ ऑगस्ट) विशेष माफी देण्यात आलेल्या कैद्यांची कारागृहातून मुक्तता करण्यात येणार आहे, अशी माहिती कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली.
चांगली वर्तणूक ठेवणाऱ्या कैद्यांची सुटका
अमृतमहोत्सवी वर्षाच्या पहिल्या टप्प्यात १५ ऑगस्ट २०२२ रोजी २०६, दुसऱ्या टप्प्यात म्हणजे यावर्षी २६ जानेवारी २०२३ रोजी १८९ कैद्यांना विशेष माफी देऊन तुरुंगातून मुक्त करण्यात आले होते. आता तिसऱ्या टप्प्यात १५ ऑगस्ट २०२३ रोजी एकूण १८६ कैद्यांना सोडण्यात येणार आहे. कारागृहातील विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना तीन टप्यांमध्ये विशेष माफी देण्यात आली आहे. (Pune News ) कैद्यांमधील शिस्त, त्यांचे आचारण विचारात घेऊन त्यांना भावी आयुष्यात प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षा माफ करण्यात आली आहे, असे कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून माफी योजनेचे निकष निश्चित केले होते. राज्यातील कैद्यांची शिक्षा माफ करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या शिफारशीनुसार कैद्यांची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या प्रस्तावास राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्यात १५ ऑगस्ट २०२२ रोजी २०६ कैद्यांची शिक्षा माफ करण्यात आली होती. (Pune News ) दुसऱ्या टप्यात २६ जानेवारी २०२३ रोजी १८९ कैद्यांची शिक्षा माफ करण्यात आली होती. तिसऱ्या टप्यात १५ ऑगस्ट २०२३ रोजी १८६ कैद्यांची शिक्षा माफ करण्यात आली आहे. राज्यातील येरवडा, मुंबई, नाशिक रोड, ठाणे, नागपूर, अमरावतीसह २४ कारागृहांतील कैद्यांची शिक्षा माफ करण्यात आली आहे.
तुरुंगातील शिस्त आणि चांगली वर्तणूक ठेवणाऱ्या कैद्यांची सुटका करून त्यांनी गुन्हेगारी जीवन सोडून देशाचे जबाबदार नागरिक बनण्यासाठी प्रोत्साहन म्हणून त्यांना ही संधी दिली जाते. यासाठीच शिक्षेचा ५० टक्के कालावधी पूर्ण केलेले राज्यात ७ कैदी आहेत. काही कैद्यांनी तारुण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांनी कोणताही गुन्हा केला नाही. अशा राज्यातील दहा कैद्यांची मुक्तता करण्यात येणार आहे. तरुण कैद्यांनी शिक्षेचा ५० टक्के कालावधी पूर्ण करणे गरजेचे आहे. (Pune News ) काही बंद्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. अशा कैद्यांनी शिक्षेचा कालावधी पूर्ण केल्यास त्यांची मुक्तता करण्यात येणार आहे. शिक्षेत सुनावण्यात आलेल्या दंडाची रक्कम भरण्यास असमर्थ असणाऱ्या कैद्यांची मुक्तता करण्यात येणार आहे. एकूण शिक्षेचा ६६ टक्के कालावधी पूर्ण करणाऱ्या १६७ कैद्यांना विशेष माफी देण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ट्रेलरच्या धडकेत टेम्पो चालक जागीच ठार
Pune News : कोथरूडमध्ये दहशत माजवली; ओंकार कुडलेविरुद्ध मोक्का कारवाई