Pune News : पुणे : पुण्याचा गणेशोत्सव हा समस्त गणेशभक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून भाविक येथे देखावे पाण्यासाठी गर्दी करतात. यामुळे या काळात पुण्यात विक्रमी गर्दी असते. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यंदा पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. गर्दीवर १८०० सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवणार आहेत. मंडळांच्या कार्यकर्त्यांना देखील मंडप परिसरात सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
पुणेकरांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज
पुणे शहर आणि परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर उत्सवाच्या काळातील अनुचित घटना, घातपाताच्या घटना रोखण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. (Pune News ) स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचारी, गुन्हे शाखेची पथके, महिला सुरक्षेसाठी दामिनी पथक, साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक विविध भागांत गस्त घालणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अडीच हजारांहून जास्त नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी पोलिसांनी संवाद साधला आहे. भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
बुधवार चौक ते मंडई दरम्यान उत्सवाच्या कालावधीत भाविकांची मोठी गर्दी असते. मंडई, हुतात्मा बाबू गेनू चौक, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना या भागात होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गर्दीचे नियंत्रण करणे शक्य होईल. (Pune News ) सदाशिव पेठ, नारायण पेठ, शुक्रवार पेठ भागातील अंतर्गत भागातील व्यावसायिकांनी देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले की, गणेशोत्सवात हजारो भाविक पुणे शहरात येतात. भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, (Pune News ) उत्सवातील गर्दीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. सार्वजनिक मंडळे, स्थानिक व्यापारी, व्यावसायिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहन केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दुचाकी आणि कारचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार; एक गंभीर