Pune News : पुणे : गेल्या आठ ते दहा महिन्यांत शहरात श्वानदंशाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. सुदैवाने शहरात कोणालाही रेबीजची लागण झालेली नाही. मागील ८ महिन्यांत १४ हजार ७२ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यापैकी एकालाही रेबीजची लागण झालेली नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण
भटक्या श्वानांनी चावा घेण्याच्या घटना शहरात सातत्याने घडत आहेत. यामुळे नागरिक देखील त्रस्त झाले आहेत. सुदैवाने तत्काळ उपचार घेतले जात असल्यामुळे मागील ३ वर्षांत रेबीजचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, मागील ३ वर्षांमध्ये शहराबाहेर राहात असलेल्या आणि रेबीज झालेल्या ५२ रुग्णांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले आहेत. २०२२ मध्ये शहरात एकही रेबीज रूग्ण आढळला नाही. (Pune News) मात्र, शहराबाहेरील २१ रेबीज रूग्णांवर उपचार करण्यात आले. या वर्षात एकूण १६५६९ जणांना श्वानदंश झाला. तर २०२३ मध्ये शहरात एकही रेबीजचा रुग्ण आढळला नाही. शहराबाहेरील १७ रेबीज रुग्णांवर उपचार करण्यात आले तर १४०७२ जणांना श्वानदंश झाला आहे.
याविषयी अधिक माहिती देताना पुणे महापालिकेच्या मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांनी सांगितले की, महापालिका हद्दीमध्ये रेबजीचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी आहे. (Pune News) कुत्रा चावल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय न केल्यास रेबीजचा धोका वाढतो. शहरात जास्तीत जास्त कुत्र्यांचे अँटी-रेबीज लसीकरण करण्यासाठी महापालिका विशेष मोहीम राबवत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार रेबीजमुळे जगभरात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ३६ टक्के मृत्यू भारतात होतात. यापैकी ९५ टक्के घटनांमध्ये कुत्रा चावल्याने रेबीजची लागण होते.
कुत्रा चावल्यानंतर त्वरित उपचार घ्यावेत, अन्यथा रेबीज हा विषाणूजन्य आजार होऊ शकतो. रेबीजचा विषाणू थेट मज्जासंस्थेवर हल्ला करतो. (Pune News) त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या चाव्यापासून लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. सारिका फुंडे यांनी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : हंगामाच्या समाप्तीला पुण्यात मेघगर्जनेसह पाऊस बरसणार
Pune News : प्रेयसीशी लगट करत असल्याच्या संशयावरून तरुणाचा खून; आरोपीला जन्मठेप
Pune news : पार्टीवरुन घरी निघालेल्या तरुणीवर मदतीच्या बहाण्याने बलात्कार