Pune News : पुणे : पुणे हे मध्य रेल्वेचा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. या विभागातील पुणे-दौंड लोहमार्गावर ताशी १३० किमी वेगाची मंजुरी मिळाली असून सोमवारपासून (ता.२८) काही गाड्या या वेगाने धावतील, असे आदेश मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी पुणे विभागाला दिले आहे. दौंड-पुणे हा प्रवास वेगवान होणार असून या प्रवासात १० मिनिटांची बचत होणार आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.
दौंड-पुणे प्रवासात १० मिनिटांची बचत होणार
पुणे-दौंड रेल्वे मार्गावर काही दिवसांपूर्वी रुळांची क्षमता वाढविण्यात आली आहे. मध्य विभागाचे मुख्य संरक्षक आयुक्त मनोज अरोरा यांनी या मार्गाची तपासणी करून काही सूचना दिल्या होत्या. पुणे रेल्वे प्रशासनाने त्या सूचनांची पूर्तता केली.
त्यानंतर मुख्य संरक्षक आयुक्तांकडून या मार्गाला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यानंतर मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी देखील या मार्गाची पाहणी केली.(Pune News) त्यानंतर त्यांनी रेल्वे गाड्या ताशी १३० किमी वेगाने धावण्यास मंजुरी दिली आहे.
याबाबत बोलताना पुण्याचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह म्हणाले कि, पुणे-दौंड लोहमार्गावर ताशी १३० किमी वेगाची मंजुरी मिळाली (Pune News) असून सोमवारपासून काही गाड्या या वेगाने धावणार आहेत. नंतर काही दिवसांत या सेक्शनमध्ये सर्व प्रवासी गाड्या ताशी १३० किमी वेगाने धावतील.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नीसह वडील जागीच ठार; चौघे गंभीर जखमी
Pune News : ”त्या” क्षणांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून उकळले तब्बल ३० लाख