पुणे : शहरात स्वतःचं घर असावं, हे अनेक (Pune MHADA) मध्यमवर्गीय कुटुंबांचं स्वप्न असतं. हेच स्वप्न (Pune MHADA Lottery) आता (MHADA News) वास्तवात (MHADA Registration) उतरण्याची संधी म्हाडाकडून उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)ने पुण्यातील विकसित आणि उत्तम ठिकाणी परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करून दिली आहेत. ही घरं लॉटरी प्रणालीद्वारे दिली जाणार असून, इच्छुक अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

पुण्यातील वाकड आणि हिंजवडीसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या भागांमध्ये म्हाडाने ‘यश्विन अर्बो सेंट्रो’ या खासगी प्रकल्पातील घरं उपलब्ध करून दिली आहेत. या प्रकल्पात 2 BHK आणि 3 BHK अशा प्रकारातील फ्लॅट्स आहेत. प्रत्येक घराचा कार्पेट एरिया साधारणतः 500 ते 600 स्क्वेअर फूट इतका असून, प्रकल्प भूमकर चौक आणि इंदिरा गांधी कॉलेज परिसरात असल्याने मुख्य हायवेला उत्तम कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, या घरांच्या किंमती बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत कमी आहेत. म्हाडाने उपलब्ध केलेली घरं सुमारे 28.42 लाख ते 28.74 लाख रुपये या दरम्यान आहेत. तर त्याच परिसरात इतर प्रकल्पांतील घरांचे दर सुमारे 80 ते 90 लाख रुपये आहेत. म्हणजेच म्हाडा योजनेंतर्गत घर खरेदी करणाऱ्यांना तब्बल 60 ते 70 लाख रुपयांची बचत होऊ शकते.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, इच्छुकांनी म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर Pune Board Lottery 2025 हा पर्याय निवडून अर्ज भरावा लागेल. अर्ज करताना ‘यश्विन अर्बो सेंट्रो’ हा प्रकल्प निवडणे आवश्यक आहे. त्यानंतर आवश्यक माहिती भरून अर्ज सादर करता येईल.
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे पुण्यात स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे. या प्रकल्पामुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.







