Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sikandar Shaikh: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला जामीन मंजूर! पंजाबमधील शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात मोठी अपडेट

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 4 November 2025, 19:46
Pune MHADA: Get a house worth 1 crore in Pune for 28 lakhs; You will get a house in a prime location at an affordable price in Pune MHADA lottery, know the complete application process

Photo-Social Media

मुंबई: महाराष्ट्र केसरी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेला पैलवान (Sikandar Shaikh) सिकंदर शेखला (Mharashtra Kesari) पंजाबमधील (Sikandar Shaikh Arrest) शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात अखेर जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयाने त्याच्या निर्दोष पार्श्वभूमीचा आणि खेळातील उल्लेखनीय कामगिरीचा विचार करून ही दिलासा देणारी निर्णय दिला आहे. सिकंदर शेखच्या नावावर आतापर्यंत कोणताही गुन्हा नोंदलेला नव्हता, ही बाब त्याच्या जामिनाला महत्त्वाची ठरली आहे.

 

पंजाब पोलिसांनी काही दिवसांपूर्वी शस्त्रास्त्र पुरवठ्याच्या प्रकरणात मोठी कारवाई करत सिकंदर शेखसह चौघांना अटक केली होती. पपला गुर्जर टोळीला शस्त्रांचा पुरवठा केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 1 लाख 99 हजार रुपये रोख रक्कम, 5 पिस्तुलं, काही काडतुसे आणि स्कॉर्पिओ-एन व एक्सयूव्ही या दोन गाड्या जप्त केल्या होत्या. या प्रकरणी पंजाबमधील खरड पोलिस ठाण्यात आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या चार आरोपींपैकी तिघांवर आधीच खंडणी आणि गंभीर गुन्ह्यांचे आरोप नोंदलेले असल्याने त्यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला. मात्र सिकंदर शेखचा गुन्हेगारी संबंध नसल्याचे लक्षात घेऊन त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.या घटनेनंतर महाराष्ट्रातील कुस्तीविश्वात मोठी खळबळ उडाली होती. राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर अनेक मानाच्या स्पर्धांमध्ये सिकंदरने उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यामुळे त्याचे अटकेत जाणे खेळाडू आणि चाहत्यांसाठी धक्कादायक ठरले होते.

सिकंदर शेखच्या कुटुंबीयांनी त्याच्या निर्दोषतेचा दावा केला आहे. त्याचे वडील आणि माजी पैलवान रशीद शेख म्हणाले की, “माझा मुलगा मेहनती आहे, त्याने प्रामाणिकपणे नाव कमावलं आहे. त्याला या प्रकरणात जाणीवपूर्वक फसवलं गेलं आहे. आमचं आयुष्य कष्टाने गेलं, आम्ही कधीही गैरमार्गाचा अवलंब केला नाही. माझा मुलगाही तसंच आहे. तो हिंद केसरी स्पर्धेची तयारी करत होता आणि त्याला खेळू न देण्यासाठी हे डावपेच रचले असावेत.”

दरम्यान, पोलिस तपास अद्याप सुरू असून, सिकंदर शेखची भूमिका नेमकी काय होती हे तपासात पुढे स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या तरी या सुप्रसिद्ध पैलवानाला जामिनावर सुटका मिळाल्याने त्याच्या समर्थकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Microsoft, Apple ते Google सह 18 कंपन्यांवर इराणकडून हल्ला? कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी घबराट

Wednesday, 1 April 2026, 8:38

पुणेकर सावधान! उन्हाचा चटका वाढला, पारा 38 अंशांच्या पार; दुपारी बाहेर पडणे टाळा

Wednesday, 1 April 2026, 8:04

राज्य प्रशासनात मोठी उलथापालथ! 10 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा कुणाला मिळाली कोणती जबाबदारी?

Wednesday, 1 April 2026, 7:55

​Daily Horoscope: एप्रिलची सुरुवात भाग्योदयाने! वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Wednesday, 1 April 2026, 7:35

दौंडमध्ये जमिनीच्या वादातून तरुणाची कोयत्याने गळा चिरून हत्या; भररस्त्यात कुटुंबावर हल्ला, 3 जण गंभीर जखमी

Wednesday, 1 April 2026, 0:00

IPL 2026 Punjab Kings vs Gujarat Titans: पंजाबचा थरारक विजय! पदार्पणवीर कूपर कॉनोलीने खेचून आणला सामना; शेवटच्या षटकापर्यंत रंगला थरार

Tuesday, 31 March 2026, 23:37
Next Post
Pune News: Pune Railway Station Traffic Improvement Meeting; Crucial discussion on rickshaw management, encroachment and congestion issues

Pune News: पुणे रेल्वे स्टेशन वाहतूक सुधारणा बैठक; रिक्षा व्यवस्थापन, अतिक्रमण व कोंडी समस्यांवर निर्णायक चर्चा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.