पुणे : आझादी का अमृत महोत्सव आणि स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने शहरातील दोन मेट्रो स्टेशनवरील ट्रायल रन यशस्वी झाला आहे. हि ट्रायल रन गरवारे कॉलेज ते डेक्कन आणि फुगेवाडी ते दापोडी मेट्रो स्थानकापर्यंत यशस्वी घेतली आहे. त्यामुळे आता मेट्रो सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आझादी का अमृत महोस्तव आणि स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने, पुणे मेट्रोने रिच १ वरील फुगेवाडी मेट्रो स्टेशन ते दापोडी मेट्रो स्टेशन आणि रिच २ वरील गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन ते डेक्कन मेट्रो अशी पहिली चाचणी पूर्ण करून आणखी एक मैलाचा दगड गाठला. त्यामुळे येत्या काही महिन्यांत मेट्रो सुरू होऊ शकते.
दरम्यान, गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन आणि फुगेवाडी मेट्रो स्टेशनमधून घेण्यात आलेल्या मेट्रोचा ताशी वेग हा १५ किमी होता. काही दिवसांमध्येच सर्व चाचण्या यशस्वी झाल्यावर या दोन्ही स्टेशनवरुन मेट्रो धावणार आहे. ट्रायल बेसवर धावलेल्या मेट्रोचा वेगही नियोजनाप्रमाणे ठेवण्यात आला होता.