पुणे : पुणेकरांनो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मेट्रोने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. पुणे मेट्रोच्या वेळेत मोठे बदल करण्यात आले आहेत. उद्या 12 नोव्हेंबरला लक्ष्मी पूजणाच्या दिवशी मेट्रोच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. पुणेकरांनी याची दखल घेऊन प्रवास करावा असे आवाहन मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या दिवशी मेट्रो सकाळी 6 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंतच धावेल. तर सोमवारपासून मेट्रो नियोजित विळेनुसार सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत धावेल. मेट्रो प्रशासनाने याबाबतची माहिती दिली आहे.
पुणे मेट्रोला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद
1 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्याच्या दोन विस्तारित मेट्रो मार्गांचं उद्घाटन करण्यात आलं. यामध्ये ‘वनाज ते रुबी हॉल’ आणि ‘सिव्हिल कोर्ट ते पिंपरी-चिंचवड मुख्यालय’ या मर्गांचा समावेश होता. या विस्तारित मार्गांमुळं पुणेकरांचा प्रवास अधिक सुसह्य झाला आहे. यापूर्वी वनाझ ते गरवारे कॉलेज या मार्गाचे आणि पिंपरी ते फुगेवाडी या मार्गाचे उद्घाटन वर्षभरापूर्वी पंतप्रधान यांच्या हस्ते झाले होते. यामध्ये वनाज ते सिव्हिल कोर्ट हा 8 किमीचा मार्ग आहे. तर प्रवासाला 22 मिनिटे लागतात. तर पिंपरी ते सिव्हील कोर्ट हा 25 किमीचा प्रवास आहे.
असा असेल तिकीट दर?
- वनाज ते रुबी हॉल – 25 रुपये
- वनाझ ते पुणे महापालिका – 20
- रुबी हॉल ते पिंपरी – 30
- रुबी हॉल ते शिवाजी नगर – 15
- पिंपरी ते सिव्हील कोर्ट – 30
- वनाज ते रेल्वे स्टेशन – 25
- रुबी हॉल ते डेक्कन – 25
#AttentionPlease
कृपया लक्ष द्या !!
पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी महत्वाची सूचना
Important Notice for Pune Metro Passengers#passengerservice #commuterService #PuneMetro pic.twitter.com/xOhjcm55SF— Pune Metro Rail (@metrorailpune) November 9, 2023