पुणे मेहकर एसटी अपघात; मृतांच्या वारसांना एसटीतर्फे दहा लाख रुपये
Pune Mehkar ST Accident : मुंबई : पुणे-मेहकर बसला कंटेनरने जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना पळसखेड चक्का (ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) गावानजीक काल मंगळवारी (ता.२३) पहाटे सहाच्या सुमारास घडली आहे. या अपघातात सहा जण जागीच ठार तर १३ हून अधिक गंभीर जखमी झाले आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. (Pune Mehkar ST Accident; Ten lakh rupees by ST to the heirs of the deceased)
जखमींवर वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने
मृतांच्या वारसांना एसटी महामंडळातर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये तत्काळ द्यावेत तसेच जखमी प्रवाशांना योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. (Pune Mehkar ST Accident) या अपघाताविषयी कळताच मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाकडून माहिती घेतली तसेच प्रशासनाने प्रवाशांना व त्यांच्या नातेवाइकांना मदत करण्याचे निर्देश दिले.
मेहकर आगाराची बस ही पुण्यावरून मेहकरकडे जात असतांना पळसखेड चक्का गावानजीक कंटेनर व बसची समोरासमोर धडक झाली. त्यात बसमधील जवळपास सह जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती किनगाव राजा पोलिसांनी दिली आहे. (Pune Mehkar ST Accident) तिघांची प्रकृती गंभीर असून १३ जण जखमी आहे. जखमीमध्ये दुसरबीड येथीलही काही जणांचा समावेश आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : धक्कादायक! पुण्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल..
Pune News : परदेश शिष्यवृत्ती योजनेकरीता अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाकडून आवाहन