पुणे : जुन्नर तालुक्यातील काळवाडी येथील शेतकरी रोहिदास गेनभाऊ काकडे यांच्या शेतामध्ये वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी (ता.20) आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला आहे.
यावेळी वनविभागाच्या अधिका-यांनी सांगितले की, हा बिबट्या आठ वर्षाचा मादी आहे. काळवाडी येथे रुद्र फापाळे या आठ वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वनविभागाने या परिसरात पिंजरे लावले होते. यापुर्वी काळवाडी येथील पिंजऱ्यात दोन बिबटे जेरबंद झाले होते.
सध्या पिंपळवंडी, काळवाडी आणि पिंपरी पेंढार या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात आता एकूण आठ बिबटे जेरबंद झालेले आहेत.