Pune | पुणे : महाराष्ट्रभर प्रबोधनात्मक व्याख्यानांच्या माध्यमातून प्रबोधनाचा झंझावात निर्माण करणारे, शिव फुले शाहू, आंबेडकर विचारांचे प्रेरणादायी व्याख्याते जगदीश ओहोळ यांना ‘प्रबोधनकार पुरस्काराने’ गौरविण्यात आले.
कवी, लेखक व व्याख्याते म्हणून प्रसिद्ध असणारे जगदीश ओहोळ हे आपल्या व्याख्यान, लेख, कविता मधून सामाजिक प्रबोधन करीत आहेत तर “जगदीशब्द फाउंडेशन”च्या माध्यमातून त्या शब्दांना प्रत्यक्ष कार्याची जोड देत आहेत.
त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना पुण्यातील महात्मा फुले सभागृहात पुरस्काराने माजी सनदी अधिकारी इ.झेड.खोब्रागडे व माजी पोलिस अधिक्षक, विचारवंत संजय अपरांती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी मानवतावादी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शिवदास म्हसदे, ज्येष्ठ नेते वसंतराव साळवे, यशदाचे प्रकल्प अधिकारी बबन जोगदंड,रेखा लगड सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप लगड, बालाजी गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!