Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मृतदेहाची ओळख पटण्यापूर्वीच खुनाचा उलगडा; पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Monday, 20 November 2023, 20:28
pune gramin police arrested two people for murder

राहुलकुमार अवचट

यवत : शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत २९ ऑक्टोबर रोजी अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला होता. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती. त्यामुळे गुन्ह्याची उकल करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पण, मृतदेहाची ओळख पटण्यापूर्वीच पुणे ग्रामीण पोलिसांनी खुनाचा उलगडा केला.

न्हावरा-केडगाव रस्त्यावरील पारगाव पुलाखाली भिमा नदीपात्रात मृतदेह मिळून आला. त्यामुळे गुन्हा केव्हा घडला याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाला मार्गदर्शन व सूचना केल्या होत्या. पथकाने सलग आठ दिवस सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता एक संशयित चारचाकी पिकअप वाहन निदर्शनास आले.

 

पिकअप वाहनाची माहिती काढली अन्…

पिकअप वाहन हे सुपा टोलनाका बाजूकडे गेल्याचे आढळून आल्याने सुपा टोलनाका परिसरात चौकशी केली असता मृत व्यक्ती टोलनाक्याजवळील हॉटेल सौंदर्या इन येथे कामास असल्याची माहिती मिळाली. हॉटेल सौंदर्या इन हे चापू भिमाजी तरटे (वय ३६ रा. पळवे खु,  ता. पारनेर जि अहमदनगर) व निलेश माणिक बोरात (वय २६, रा. मुंगशी, ता. पारनेर जि. अहमदनगर) यांनी चालविण्यासाठी घेतलेले असून, याबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी हा गुन्हा केल्याचे कबुल केले.

आगाऊ पैसे घेऊनही कामावर न आल्याने हत्या

मयत संतोष आप्पासाहेच गाडेकर (रा. टोकवाडी ता मंठा जि जालना) असल्याची माहिती मिळाली. संतोष गाडेकर याने हॉटेलमध्ये काम करण्यासाठी आगाऊ रक्कम घेतलेली होती, परंतु तो काम करत नसल्याने त्याचा खून करून पिकअप वाहनातून पारगाव पुलावरून भिमा नदीपात्रात टाकून देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे चापू तरटे व निलेश बोरात या दोन्ही आरोपींना पिकअप वाहनासह शिरूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, अतुल डेरे, राजु मोमीण, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे यांच्या पथकाने केली.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54

ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Thursday, 2 July 2026, 18:51
Next Post
Doctor orders Rs 300 lipstick online, is duped of Rs 1 lakh

Online Shopping Fraud: महिला डॉक्टरला 300 रुपयांची लिपस्टिक पडली एक लाखाला; जाणून घ्या कशी झाली फसवणूक?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.