Sunday, May 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : सुरक्षित वाहतुकीसाठी नियमांचे पालन हेच ‘सुरक्षा कवच’! एमआयटी एडीटी विद्यापीठात पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदेंचे आवाहन

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 6 January 2026, 18:25
Pune

photo- ppn

Pune : स्वयंशिस्तीमुळे वैयक्तिक स्वातंत्र्यावर मर्यादा येत नसून, प्रत्यक्षात आपले रक्षण होत असते. वाहतूक सुरक्षा ही एक सामूहिक जबाबदारी असून, खरे सामर्थ्य वेगात नसून नियंत्रणात असते. हे तरुणांनी समजून घेतले पाहिजे आणि सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन पुणे परिमंडळ-५ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी केले.

 

लोणी काळभोर (ता.हवेली) येथील एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठात पोलीस वर्धापन दिन आणि रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित व्यसनमुक्ती व वाहतूक जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन एमआयटी एडीटी विद्यापीठ, हडपसर वाहतूक विभाग आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

याप्रसंगी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनिता कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., हडपसर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, विद्यार्थी कल्याण सहाय्यक संचालक डॉ. प्रतिभा जगताप, अधिष्ठाता डॉ. गणेश पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. यांनी विद्यार्थ्यांना जीवनात ‘३६०-डिग्री’ दृष्टिकोनाचा अवलंब करण्याची गरज प्रतिपादित केली. सर्वसमावेशक दृष्टिकोन अंगीकारण्यासाठी स्वयंशिस्त ही पहिली गरज असून, स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करण्याचे आणि व्यसनमुक्तीसाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर ‘विश्वशांती प्रार्थने’ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांनी आपल्या प्रास्ताविकात स्वयंशिस्तीचे महत्त्व विशद केले.

पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी वाहतूक नियमांच्या पालनावर भर दिला आणि विद्यापीठाच्या शिस्तीचे कौतुक करताना ही शिस्त आध्यात्मिक पायावर निर्माण झाल्याचे नमूद केले. वाहतूक पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी वाहतूक सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. प्रतिभा जगताप यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

‘कम्युनिटी पोलिसिंग’मध्ये युवकांचा सहभाग आवश्यक!
अंतर्गत सुरक्षेसाठी ‘कम्युनिटी पोलिसिंग’ आवश्यक असून, पोलीस वर्धापन दिन सप्ताहादरम्यान तरुणांनी पोलिसांशी संवाद साधावा. पोलीस स्टेशनला भेट देऊन तेथील कार्यपद्धती समजून घ्यावी, तसेच वाहतूक व्यवस्थापनात स्वयंसेवक म्हणून काम करून पोलीस दलाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, असे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले.

…अन्यथा तिसऱ्या गुरूंना यावे लागते
विद्यार्थ्यांच्या जीवनातील विविध पातळ्यांवर प्राप्त होणाऱ्या गुरूंची भूमिका अत्यंत मोलाची असते. आई-वडील हे आद्य गुरू, तर शाळा व महाविद्यालयातील शिक्षक हे दुसरे गुरू असतात. परंतु एखाद्याचे वर्तन खराब असेल आणि ते पहिल्या दोन गुरूंच्या नियंत्रणाबाहेर गेल्यास, तिसरे गुरू अर्थात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागतो. त्यामुळे या गुरूच्या सान्निध्यात आले की कुठलाही शिष्य नक्कीच सुधारतो, अशी कोटी डॉ. शिंदे यांनी केल्यावर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Murder News : फुलांनी सजलेल्या गाडीत गोळीबार, लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची हत्या; आनंदाचे रूपांतर शोकांत

Sunday, 3 May 2026, 13:46

Missing Link : खबरदार! मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’वर गाडी थांबवली तर थेट कारवाई ; AI च्या नजरेतून सुटका नाही”

Sunday, 3 May 2026, 13:42

Pune Nasrapur Case : “न्याय मिळत नाही तोपर्यंत नेतेमंडळींनी भेटायला येऊ नये”; नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या वडिलांची भावनिक विनंती”

Sunday, 3 May 2026, 13:15
Man murdered his wife and daughter in pune

Pune Crime News : धायरीत कौटुंबिक वादातून सासऱ्याकडून सुनेचा खून ; आरोपी फरार”

Sunday, 3 May 2026, 13:04

Delhi Judge Suicide : ‘पप्पा, जगणं अवघड झालंय…’ फोननंतर काही तासांतच न्यायाधीशाची आत्महत्या; वैवाहिक वादाचा संशय”

Sunday, 3 May 2026, 12:16

Pune News : हिंजवडीत सुरक्षारक्षकाकडून चिमुरडीशी गैरवर्तन, आरोपी अटकेत

Sunday, 3 May 2026, 12:09
Next Post
Big Breaking

Big Breaking : सासवड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विकास ओमासेवर 5 हजारांची लाच मागीतल्याप्रकरणी गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.