पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी. आजपासून पुणेकरांच्या सेवेत जिल्हा न्यायालय ते स्वारगेट असा मेट्रो मार्ग सुरु होत आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. ऑनलाईन पध्दतीन नरेंद्र मोदी यांनी या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या मार्गाचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थितीत आहेत. आज सायंकाळी 4 वाजता हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भुमिगत मेट्रो मार्ग आहे. या मार्गावर जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई, स्वारगेट असे 4 मेट्रो स्थानके आहेत.
यासोबतच पंतप्रधान मोदींच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक भिडे वाडा येथे पहिल्या मुलींच्या शाळेचं भूमिपूजन देखील करण्यात आले. तर राज्यातील बिडकीन औद्योगिक क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर लोकार्पण आणि सोलापूर विमानतळाचे उद्घाटन देखील ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
असे असतील या मार्गावरचे तिकीट दर…?
– जिल्हा न्यायालय ते कसबा पेठ: 10 रुपये
– जिल्हा न्यायालय ते मंडई: 15 रुपये
– जिल्हा न्यायालय ते स्वारगेट : 15 रुपये
– स्वारगेट ते मंडई: 10 रुपये
– स्वारगेट ते कसबा पेठ: 15 रुपये
– स्वारगेट ते जिल्हा न्यायालय: 15 रुपये