Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुर्डुवाडीहून परतताना तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू; अज्ञात वाहनचालकाविरुद्ध यवत पोलिसांत गुन्हा

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 27 June 2026, 15:33

यवत, ता. २७ : कुर्डुवाडी येथे नातेवाईकांना भेटून परत येत असताना एका तरुणाचा सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने धडक देऊन चालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी वैशाली विश्वास काळे (वय ५०, रा. आदर्शनगर, येरवडा, पुणे) यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचा मुलगा विशाल विश्वास काळे हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. १९ जून रोजी तो पत्नी ऋतुजासह कुर्डुवाडी (कवेरोपळे) येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेला होता. २३ जून रोजी दुपारी ऋतुजाच्या बहिणीचा फोन आला. तिने विशालने ऋतुजाला टेंभुर्णी येथून बसमध्ये बसवून दिल्याचे सांगितले. मात्र, विशाल घरी परतला नसल्याची माहिती मिळाली.

काही वेळाने शंकर शेलार यांच्या माध्यमातून सोलापूर-पुणे महामार्गावरील बोरीभडक (ता. दौंड) परिसरात एका अपघातग्रस्ताचा फोटो व्हॉट्सॲपवर आल्याची माहिती मिळाली. फोटो पाहिल्यानंतर तो विशालच असल्याची शंका व्यक्त करण्यात आली. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला. यवत पोलिस ठाण्यात आल्यानंतर पोलिस आणि शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विशाल काळे यांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती दिली.

 

त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून, येरवडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवून आणल्याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ व १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यवत पोलिस करीत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“राजीनाम्याची मागणी कायम, पण चर्चा सुरू!” सरकार आणि CJP मधील बैठकीत नेमकं काय घडलं?

Friday, 24 July 2026, 17:57

“साहेब त्या दोघांना पकडा” पुणे पोलिसांना टीप मिळाली; दिवे घाटात दोघांना पकडून झडती घेतांना बॅग उघडताच शेपूट सळसळली अन्…

Friday, 24 July 2026, 17:18

तळीरामांनो पार्टीचा प्लॅन रद्द करा! शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात कडक ‘ड्राय डे’ जाहीर

Friday, 24 July 2026, 16:44

तुकाराम मुंढेंचा दणका! पुण्यातील १२ हॉटेल-बेकरींचे परवाने तडकाफडकी निलंबित; ३ लाखांचा माल जप्त

Friday, 24 July 2026, 16:07

थेऊरफाटा उड्डाणपुलाच्या कामाची आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडून पाहणी; दर्जा आणि सुरक्षेशी तडजोड न करण्याचे प्रशासनाला निर्देश…

Friday, 24 July 2026, 16:01

पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बसमधून तब्बल सव्वा 7 लाखांचे दागिने लंपास; दौंड तालुक्यातील हॉटेलवरील घटना, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 24 July 2026, 15:41
Next Post

आठवडे बाजारात पोलिसांची कडक नजर; चोरीला आळा, वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर धडक कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.