Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : खुटबाव येथे “रागाने का बघतोस?” म्हटल्याने तरुणाला काठीने मारहाण; यवत पोलिसांत गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 27 June 2026, 10:29

यवत, (पुणे) : “माझ्याकडे रागाने का बघतोस?” असे म्हटल्याने एका 26 वर्षीय तरुणाला काठीने मारहाण करण्यात आली. यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुटबाव (ता. दौंड) हद्दीतील साळोबावस्ती परिसरात ही बुधवारी (ता. 24) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

अमोल बाळासाहेब साळवे (वय 26, रा. खुटबाव साळोबावस्ती, ता. दौंड, जि. पुणे) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर विजय राजू भांडवलकर (रा. सदर) असे मारहाण केलेल्या तरुणाचे नाव आहे. साळवे यांनी दिलेल्या जबाबावरून यवत पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल साळवे हे कुटुंबीयासोबत खुटबाव येथे राहतात. त्यांच्या घरापासून काही अंतरावर त्यांचा ओळखीचा विजय राजू भांडवलकर हा राहतो. बुधवारी (ता. 24) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अमोल हे साळोबावस्ती येथील गणपती मंदिराजवळ उभे होते.

 

त्याच वेळी त्यांची भाचीने “मामा” अशी हाक मारून त्यांना जवळ बोलावले. अमोल भाचीकडे जात असताना, तेथील एका दुकानासमोर उभा असलेला विजय राजू भांडवलकर हा अमोल यांच्याकडे रागाने बघत होता. अमोल यांनी त्याला सहज विचारले, “तू माझ्याकडे रागाने का बघतोस?”

“रागाने का बघतोस” असे विचारताच आरोपी विजय याने अमोल यांना अश्लील शिवीगाळ करत दमदाटी सुरू केली. यावेळी त्या ठिकाणी पडलेली एक लाकडी काठी हातात घेतली आणि अमोल यांच्यावर हल्ला चढवला. त्याने या काठीने अमोल यांच्या दोन्ही हातांवर, पाठीवर आणि छातीवर बेदम प्रहार केले. या गंभीर मारहाणीमुळे अमोल साळवे जखमी होऊन जागीच खाली कोसळले.

अमोल यांचा आरडाओरडा ऐकून त्यांचे मामाचा मुलगा सचिन इंगळे आणि अविनाश नुथर कोलते यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी अमोल यांना गंभीर अवस्थेत मोटारसायकलवर बसवून उपचारासाठी तात्काळ यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी ग्रामीण रुग्णालय गाठले.

दरम्यान, अमोल साळवे पूर्ण शुद्धीवर असताना त्यांची पत्नी काजल साळवे आणि बहीण भारती मिरपगार यांच्या समक्ष पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला. साळवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विविध कलमान्वये विजय भांडवलकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

“राजीनाम्याची मागणी कायम, पण चर्चा सुरू!” सरकार आणि CJP मधील बैठकीत नेमकं काय घडलं?

Friday, 24 July 2026, 17:57

“साहेब त्या दोघांना पकडा” पुणे पोलिसांना टीप मिळाली; दिवे घाटात दोघांना पकडून झडती घेतांना बॅग उघडताच शेपूट सळसळली अन्…

Friday, 24 July 2026, 17:18

तळीरामांनो पार्टीचा प्लॅन रद्द करा! शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात कडक ‘ड्राय डे’ जाहीर

Friday, 24 July 2026, 16:44

तुकाराम मुंढेंचा दणका! पुण्यातील १२ हॉटेल-बेकरींचे परवाने तडकाफडकी निलंबित; ३ लाखांचा माल जप्त

Friday, 24 July 2026, 16:07

थेऊरफाटा उड्डाणपुलाच्या कामाची आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडून पाहणी; दर्जा आणि सुरक्षेशी तडजोड न करण्याचे प्रशासनाला निर्देश…

Friday, 24 July 2026, 16:01

पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बसमधून तब्बल सव्वा 7 लाखांचे दागिने लंपास; दौंड तालुक्यातील हॉटेलवरील घटना, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 24 July 2026, 15:41
Next Post

Lotto Casino: De Beste Gaming Bestemming voor Bezoekers in Nederland

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.