राहुल कुमार अवचट
(Yavat New) यवत : यवत येथील उजव्या कालव्या ओलांडून जाणारा आनंदग्राम गृहनिर्माण संस्था व साई व्हिलेज सोसायटी यासह मलभरे वस्ती व दक्षिणेकडील भाग यवत गावाला जोडणारा रस्त्याची दोन ठिकाणी दुरावस्था झालेली असून याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी युवासेनेचे उप तालुका अधिकारी शुभम माळवे निविदनाद्वारे ग्रामपंचायतीकडे केली आहे, आनंदग्राम गृहनिर्माण संस्था व साई व्हिलेज सोसायटीकडे ग्रामपंचायत कार्यालय शेजारूनच रस्त्यावर गाडी येता-जाता मोठ्या प्रमाणावरती चढ-उतार झाला असून येथे गाडी घसरुन आत्तापर्यंत बऱ्याच जणांना दुखापत झाली आहे.
रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी…!
या रस्त्यावरच दोन टप्प्यात रस्ते केले असून पहिला व दुसरा रस्ता व्यवस्थित जोडले गेलेले नाहीत, त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचे हाल होत असून यात बऱ्याच महिला व वयोवृद्ध लोक गाडीवरून घसरले आहे. या रस्त्यावरून आनंदग्राम सोसायटी, साई व्हिलेज यांसह मलभारी वस्ती वाघदरा वस्ती व दोरगेवाडीकडे जाणाऱ्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबतीत ग्रामविकास अधिकारी बबन चखाले यांना विचारले असता ग्रामपंचायतीमार्फत इतर ठिकाणी काम सुरू झाल्यास तात्काळ या दोन्ही ठिकाणची देखील दुरुस्ती केली जाईल असे त्यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
यवत ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम! गावातील सुवासिनींसह विधवा महिलांना दिला हळदी कुंकूवाचा मान!