राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या दुचाकी चालकाने रस्ता ओलांडणाऱ्या एका ६५ वर्षीय व्यक्तीला जोरदार धडक दिली. या धडकेत ६५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. ३०) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास यवत (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.
यवत येथील घटना..
ठकाजी बाबु कोरडकर (वय ६५ वर्ष, रा.राक्षसवाडी खुर्द, ता.कर्जत, जि.अहमदनगर) असे अपघातात मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Yavat News) याप्रकरणी हंबीरराव कोंडीबा काळे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. ठकाजी कोरडकर हे यवत एसटी थांबा जवळ पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडत होते. यावेळी सोलापूरकडून पुणेच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी चालकाने कोरडकर यांना जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता कि, कोरडकर हे १०० फुटापर्यत फरफटत गेले. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाल्या होत्या.
त्यांना तात्काळ यवत येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (Yavat News) यावेळी घटनास्थळी यवत पोलिसांनी भेट दिली असून सदर घटनेचा पंचनामा केला आहे. याबाबत हंबीरराव काळे यांनी फिर्याद दिली असून दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार बगाडे हे करीत आहेत.
दरम्यान, जावजीबुवाचीवाडी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत सोलापूरच्या दिशेने निघालेल्या दुचाकी चालकाने एका वृद्ध महिलेला जोरदार धडक दिल्याची घटना बुधवारी (ता. ३०) दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. (Yavat News) या घटनेत सदर महिला हि जखमी झाली असून तिला लाईफ़ केअर रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सिद्धिविनायक हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या परिसरात तीव्र उतार असल्याने वारंवार अपघात होत असून राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन या ठिकाणी अपघात होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : यवत येथे थांबलेल्या एसटीला कार धडकून अपघात; प्रवासी बालंबाल बचावले
Yavat News : यवत स्टेशन येथे उड्डाणपूल बांधावा
Yavat News : पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त भुलेश्वरला भक्तीचा महापूर