Tuesday, November 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पहिले लग्न लपवून तरुणाशी विवाह; वडिलोपार्जित संपत्तीच्या वादातून पतीवर केले चाकूने वार, लोणी काळभोर येथील चार जणांवर गुन्हा दाखल

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 2 November 2026, 12:45

लोणी काळभोर, ता. 2 : पहिल्या विवाहाची माहिती लपवून तरुणाशी दुसरा विवाह केल्याचा आणि त्यानंतर वडिलोपार्जित संपत्तीच्या वादातून पतीवर चाकूने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे, तर पतीकडील सोन्याची चैन आणि अंगठी बळजबरीने घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याप्रकरणी मांजरी (ता. हवेली) परिसरातील 25 वर्षीय तरुणाने पत्नी, सासू, सासरे आणि मेहुण्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

रुतुजा प्रज्वल भोंग, महेश बनकर रेखा बनकर, संदेश बनकर (सर्व रा. कन्या शाळेच्या पाठीमागे, लोणी काळभोर, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहे. याप्रकरणी संदेश उर्फ सोहम घुले (वय 25 , रा. महंमदवाडी, पुणे) यांनी मांजरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडे दिलेल्या माहितीनुसार, संदेश घुले हा बी. फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. 7 मे 2026 रोजी इन्स्टाग्रामवरील मैत्रिणीच्या माध्यमातून त्याची रुतुजा बनकर हिच्याशी ओळख झाली. त्यानंतर दोघांनी 30 मे रोजी आळंदी येथील मंगल कार्यालयात विवाह केला. विवाहाच्या नोंदणीवेळी रुतुजाने प्रतिज्ञापत्रावर आपला प्रथम विवाह असल्याचे नमूद केल्याचा दावा तरुणाने केला आहे.

विवाहानंतर दोघे मांजरी येथील चिंतामणी प्लाझामध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहू लागले. मात्र, काही दिवसांतच पत्नीच्या व्यसनाच्या सवयीवरून वाद सुरू झाल्याचे तरुणाने तक्रारीत म्हटले आहे. पत्नी आपल्यालाही नशा करण्यासाठी जबरदस्ती करीत होती. तसेच तिचा भाऊ उसने पैसे मागून पैसे न दिल्यास मारहाण व धमकी देत असल्याचा आरोपही त्याने केला आहे.

दरम्यान, पत्नीच्या हट्टापायी स्वतःच्या गळ्यातील सहा तोळ्यांची सोन्याची चैन मोडून तिच्यासाठी सोन्याचे झुमके, दोन अंगठ्या आणि अन्य दागिने बनवून दिले होते. त्यासाठीच्या पावत्या स्वतःच्या नावावर असल्याचेही त्याने सांगितले. मात्र, पत्नीने हे दागिने लोणी काळभोर येथील मणप्पुरम गोल्डमध्ये गहाण ठेवून नंतर मोडीत दिल्याचे समजल्याचा दावा त्याने केला आहे.

26 जुलै रोजी पत्नीचे पहिले लग्न प्रज्वल भोंग याच्याशी झाले असून त्यांचा घटस्फोट झालेला नसल्याची माहिती समोर आल्याचे तरुणाने जबाबात नमूद केले आहे. याबाबत जाब विचारल्यानंतर पत्नीने तिच्या माहेरच्या मंडळींना बोलावले. त्यावेळी सासरे आणि मेहुण्याने मारहाण करून संपूर्ण कुटुंबाला संपविण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच मेहुण्याने गळ्यातील 61.16 तोळ्यांची सोन्याची चैन पेंडंटसह आणि 10.33 तोळ्यांची अंगठी घेतल्याचे तरुणाने तक्रारीत म्हटले आहे.

वडिलोपार्जित संपत्तीसाठी चाकूने वार?

या प्रकरणाला आणखी गंभीर वळण तेव्हा मिळाले, जेव्हा तरुणाच्या आई-वडिलांनी त्याला संपत्तीतून बेदखल केल्याची नोटीस पाठवली. यावरून पत्नीने वाद घालत पतीच्या वडिलोपार्जित संपत्तीतील हिस्सा आपल्याला हवा असल्याचे सांगितल्याचा आरोप आहे. 4 ऑगस्ट 2026 रोजी याच कारणावरून झालेल्या वादात पत्नीने भाजी कापण्याच्या चाकूने उजव्या हातावर वार करून जखमी केले. त्यानंतर घराला बाहेरून कडी लावून ती निघून गेल्याचे तरुणाने म्हटले आहे.

दरम्यान, जखमी अवस्थेत तरुणाने पोलिसांच्या 112 क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मांजरी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्याला वैद्यकीय उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवले होते. उपचारासंबंधी कागदपत्रेही तक्रारीसोबत जोडल्याचे त्याने सांगितले आहे. पहिले लग्न लपवून विवाह केल्यापासून ते सोन्याचे दागिने बळजबरीने घेणे, मारहाण, चाकूने वार आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्यापर्यंत गंभीर आरोप या तक्रारीत करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे मांजरीसह लोणी काळभोर परिसरात खळबळ उडाली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात चोरट्यांचा उच्छाद! सणासुदीच्या काळात धनकवडी अन् वडगाव शेरीत तब्बल ८.६९ लाखांची घरफोडी

Tuesday, 3 November 2026, 15:39

“3 हजार दे आणि…” स्पा सेंटरमध्ये सुरू होता देहव्यापाराचा संशयित धंदा; पोलिसांच्या धाडीत भांडाफोड!

Tuesday, 3 November 2026, 15:19

शिंदवणे घाटात चालत्या ट्रकला ओम्नीची पाठीमागून जोरदार धडक; तिघे गंभीर जखमी

Tuesday, 3 November 2026, 15:08

महाराष्ट्र पोलिस दलात मोठे फेरबदल! १६ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा संपूर्ण यादी

Tuesday, 3 November 2026, 14:48

दिल्ली-पुणे विमानात खळबळ! प्रवाशाचा थेट इमर्जन्सी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न; इंडिगो विमानात नेमकं काय घडलं?

Tuesday, 3 November 2026, 14:45

पुण्याचा चेहरामोहरा बदलणार! 2030 पर्यंत शहरासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; काय म्हणाले? वाचा!

Tuesday, 3 November 2026, 14:31
Next Post

पुणे जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय! दिव्यांग बांधवांच्या खात्यात जमा होणार तब्बल 5.90 कोटी रुपये; सभापती जितेंद्र बडेकर यांची माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp