Wednesday, November 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात चोरट्यांचा उच्छाद! सणासुदीच्या काळात धनकवडी अन् वडगाव शेरीत तब्बल ८.६९ लाखांची घरफोडी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 3 November 2026, 15:39

पुणे : सणासुदीच्या काळात पुणे शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. धनकवडी आणि वडगाव शेरी परिसरात चोरट्यांनी बंद सदनिकांचे कुलूप तोडून तब्बल ८ लाख ६९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. या दोन्ही घटनांप्रकरणी सहकारनगर आणि चंदननगर पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे.

पुणे-सातारा रस्त्यावरील के. के. मार्केटसमोरील पुण्याईनगर परिसरात असलेल्या कावेरी सोसायटीमध्ये घरफोडीची घटना घडली. याप्रकरणी एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला धनेश्वर मंदिर परिसरातील कावेरी सोसायटीमध्ये राहतात. ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्या सदनिकेला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर शयनगृहातील कपाट उचकटून त्यामध्ये ठेवलेले ३ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महिला घरी परतल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर पुढील तपास करत आहेत.

दुसरी घरफोडीची घटना वडगाव शेरीतील गणेशनगर परिसरात घडली. येथील श्री ओम सोसायटीमधील एका बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ४ लाख ८९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

या प्रकरणी संबंधित महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन्ही घटनांमध्ये बंद सदनिकांना लक्ष्य करण्यात आल्याने नागरिकांनी घराबाहेर जाताना सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा शोध घेत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लोणी काळभोर येथील पालखी मैदानाजवळ गांजा ओढताना दोघे पोलिसांच्या जाळ्यात!

Wednesday, 25 November 2026, 19:11

लोणी काळभोर येथील गावठी दारू विक्रीच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा; एकाला अटक

Wednesday, 25 November 2026, 19:03

महावितरणच्या कामाचा बळी? न्हावरे-इनामगाव रस्त्यावर निर्वी येथे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

Wednesday, 25 November 2026, 18:58

गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा वाद पुन्हा न्यायालयात; महायुतीच्या सर्व संचालकांना नोटीस बजावण्याचे आदेश!

Wednesday, 25 November 2026, 18:57

Big Breaking : ट्रिनिटी कॉलेज सुटल्यानंतर बसस्टॉपवर उभ्या विद्यार्थ्यांना साऊंड सिस्टिमच्या ट्रकने उडवले! तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू; तीन जण गंभीर जखमी

Wednesday, 25 November 2026, 17:53

आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात औद्योगिक विकास आणि प्रदूषण नियंत्रणाचा आढावा; मुदत संपलेल्या भूखंडांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश

Wednesday, 25 November 2026, 17:49
Next Post

शिरूर भूमी अभिलेखच्या कारभाराचा माजी सैनिकाला फटका! तीन वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत; खरेदी केलेले चार गुंठे क्षेत्रच गायब?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp