Wednesday, November 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महावितरणच्या कामाचा बळी? न्हावरे-इनामगाव रस्त्यावर निर्वी येथे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

योगेश मारणेby योगेश मारणे
Wednesday, 25 November 2026, 18:58

न्हावरे: न्हावरे-इनामगाव रस्त्यावर निर्वी (ता.शिरूर) गावाच्या हद्दीमध्ये शिवाज्ञा हॉटेलजवळ दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात ३५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दत्ता नाना रायकर (वय ३५, रा. हंगेवाडी-जगतापवस्ती, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर, सध्या रा.यवत, ता.दौंड, जि.पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. बुधवारी (ता.२५) पहाटे हा अपघात उघडकीस आला. याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता रायकर हे मंगळवारी (ता.२४) रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास हंगेवाडी येथून आपल्या यवत येथील राहत्या घरी जाण्यासाठी मोटारसायकलवरून (क्र. एम.एच१४,बी.डी२०५३) निघाले होते. दरम्यान, न्हावरे ते निर्वी रस्त्यावरील दोन्ही गावांच्या शिवेवर निर्वी गावाच्या हद्दीमध्ये शिवाज्ञा हॉटेलजवळ रस्त्याच्या कडेला महावितरणच्या केबलसाठी खोदलेल्या खड्ड्याच्या मातीच्या ढिगाऱ्यावरून दत्ता रायकर यांची दुचाकी घसरून अपघात झाला. संबंधित खोदलेल्या खड्ड्याचा मुरूम मुख्य रस्त्यावर असल्यामुळे दुचाकी गाडी घसरून हा अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

या अपघाताबाबत बुधवारी (ता.२५) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हंगेवाडी (ता.श्रीगोंदा) गावातील बबलू रायकर यांनी दत्ता रायकर यांचा भाऊ ज्ञानदेव नाना रायकर यांना फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली असता, दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ पडलेली दिसली. तसेच जवळच एका दगडालगत रक्त सांडल्याचे आढळून आले.

अपघातात जखमी झालेल्या दत्ता रायकर यांना तत्परतेने श्रीनाथ रुग्णवाहिकेद्वारे न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच चेहऱ्यावरही खरचटल्याच्या जखमा होत्या.

या घटनेमुळे रायकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दत्ता रायकर यांच्या पाठीमागे आई-वडील, पत्नी, दोन लहान मुले, भाऊ-भावजय असा मोठा परिवार आहे. दरम्यान, रस्त्याच्या कडेला महावितरणच्या वीज वाहक केबलसाठी कंत्राटदाराने खड्डा खणलेला असून, त्या खड्ड्याच्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रस्त्यालगत अशा प्रकारे मातीचे ढिगारे ठेवले जात असल्यास वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. संबंधित ठिकाणी योग्य खबरदारी आणि सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत का, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार विनोद मोरे करीत आहेत.

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महावितरणच्या कामाचा बळी? न्हावरे-इनामगाव रस्त्यावर निर्वी येथे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

Wednesday, 25 November 2026, 18:58

गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा वाद पुन्हा न्यायालयात; महायुतीच्या सर्व संचालकांना नोटीस बजावण्याचे आदेश!

Wednesday, 25 November 2026, 18:57

Big Breaking : ट्रिनिटी कॉलेज सुटल्यानंतर बसस्टॉपवर उभ्या विद्यार्थ्यांना साऊंड सिस्टिमच्या ट्रकने उडवले! तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू; तीन जण गंभीर जखमी

Wednesday, 25 November 2026, 17:53

आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात औद्योगिक विकास आणि प्रदूषण नियंत्रणाचा आढावा; मुदत संपलेल्या भूखंडांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश

Wednesday, 25 November 2026, 17:49

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास; यवत पोलीसांच्या तपासाला यश

Wednesday, 25 November 2026, 17:41

शिरूरमधील वाढत्या गुन्हेगारीची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून दखल; सहा आठवड्यांत अहवालाचे निर्देश

Wednesday, 25 November 2026, 16:46
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp