Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्याचे नाव बदलणार? ‘फुलेनगर’ करण्याची मुख्यमंत्र्यांकडे थेट मागणी; नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 12 November 2026, 8:33

पुणे: पुणे शहराच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुण्याचे नाव बदलून ‘फुलेनगर’ ठेवण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाने केली आहे. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी शहराचे नामांतर करावे, अशी भूमिका या निवेदनातून मांडण्यात आली आहे.

महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त 2027 मध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्याची मागणीही संघटनेने केली आहे. फुले यांनी शिक्षण आणि सामाजिक सुधारणांसाठी केलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

याशिवाय, महात्मा फुले यांच्या विचारांवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन आयोजित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये त्यांच्या नावाने अध्यासन सुरू करावे, तसेच सामाजिक आणि प्रबोधन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना ‘सत्यशोधक भूषण पुरस्कार’ देण्याची व्यवस्था करावी, असेही संघटनेने सुचवले आहे.

दरम्यान, पुण्याच्या नामांतराबाबत यापूर्वीही वेगवेगळ्या संघटनांकडून विविध पर्याय पुढे आले आहेत. काही संघटनांनी पुण्याचे नाव ‘जिजापूर’ किंवा ‘जिजाऊ नगर’ करण्याची मागणी केली होती. तर सुजात आंबेडकर यांनी पुण्याचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ ठेवण्याची मागणी केल्याचेही समोर आले होते. त्यामुळे या विषयावर वेगवेगळे मतप्रवाह दिसून आले आहेत.

आता ‘फुलेनगर’ नामांतराच्या मागणीमुळे हा विषय पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत राज्य सरकार कोणती भूमिका घेते आणि पुढे काय निर्णय होतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मराठा तरुणांसाठी जरांगेंचा मोठा निर्णय! हेल्पलाईन क्रमांक जारी, थेट केलं आवाहन

Thursday, 12 November 2026, 23:00

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! रब्बी पीक विमा नोंदणी सुरू; 31 मार्चपर्यंत संधी, पाहा कोणत्या पिकांसाठी किती मुदत?

Thursday, 12 November 2026, 22:25

मैथिली ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या! तक्रार प्राप्त होताच प्रशासनाचा मोठा निर्णय; थेट कारवाईचे आदेश!

Thursday, 12 November 2026, 22:05

उरुळी कांचन-आष्टापूर रस्त्यावर उभ्या ऊस ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक ; उरुळी कांचन जवळील तरुणाचा जागीच मृत्यू..

Thursday, 12 November 2026, 21:51

तलाठ्यासह स्वतःसाठी मागितली लाच; 7/12 च्या नोंदीसाठी 20 हजारांचा सौदा, महिला अधिकारी ACBच्या ताब्यात!

Thursday, 12 November 2026, 20:33

हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत अनेक मातब्बरांनी घातले लक्ष, सर्वच पक्षीय मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!

Thursday, 12 November 2026, 20:22
Next Post

मढ आयलंडवरील पार्टी ठरली भयानक! तरुणीला गुंगीचे औषध देऊन तोडले शरीराचे लचके; 22 वर्षीय विद्यार्थी अटकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp