Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत अनेक मातब्बरांनी घातले लक्ष, सर्वच पक्षीय मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 12 November 2026, 20:22

लोणी काळभोर, ता. १२ : आगामी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हवेली तालुक्यात सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत दोन पॅनलमध्ये थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, या निवडणुकीत तालुक्यातील अनेक मातब्बर नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ सहकारी संस्थेची निवडणूक न राहता हवेलीतील राजकीय वर्चस्वाची लढाई ठरण्याची चिन्हे आहेत.

या निवडणुकीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक विकास दांगट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे हवेली युवक तालुकाध्यक्ष संदीप गोते यांच्या नेतृत्वाखाली ‘अण्णासाहेब मगर परिवर्तन पॅनल’ निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.

तर दुसरीकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश मस्के, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप काळभोर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पीडीसी बँकेचे विद्यमान संचालक प्रदीप कंद आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश घुले यांच्या नेतृत्वाखाली ‘सहकार महर्षी अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनल’ निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे.

दोन्ही पॅनलमध्ये अनुभवी आणि राजकीय वजन असलेल्या नेत्यांचा समावेश असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, आगामी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनेही या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणत्या पॅनलला सभासदांचा कौल मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, दोन्ही पॅनलने सर्व प्रवर्गांत उमेदवार उभे केले असून, मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नेत्यांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जाण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रतिष्ठेची बनल्याने प्रचारात आर्थिक ताकदीचाही मोठ्या प्रमाणावर वापर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. त्यामुळे हवेली तालुका खरेदी-विक्री संघाची ही निवडणूक जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील आगामी राजकीय समीकरणांची दिशा ठरवणारी ठरणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

अण्णासाहेब मगर परिवर्तन पॅनलचे उमेदवार

संस्था प्रतिनिधी : रामदास सहादू दांगट, राजेंद्र ज्ञानेश्वर खांदवे, सुभाष सदाशिव टकले, सुभाष ज्ञानोबा कांचन, हनुमंत काळुराम हरगुडे, साईनाथ रामराव वाळके, कृषीराज दत्तात्रय चौधरी, तुषार बापुसो कुटे, राजेंद्र किसन कोंडे आणि शरद गोपाळ भालेकर.
वैयक्तिक सभासद प्रतिनिधी : विराज सुभाषराव काळभोर, प्रविण सुभाष खांदवे, सूर्यकांत दत्तात्रय काळभोर आणि सोमनाथ गोविंद खांदवे.
महिला प्रतिनिधी : कल्पना शिवाजी खटाटे आणि सुशिला राजाराम कदम.
इतर मागास प्रवर्ग : भरत दत्तात्रय काळभोर.
भटक्या-विमुक्त जाती प्रवर्ग : भगवान शंकर मडदे.
अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग : विनायक लक्ष्मण कांबळे.

सहकार महर्षी अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार

संस्था प्रतिनिधी : कल्याण अंकुश शिंदे, संजय सोपान गायकवाड, चैतन्य कैलास जोरी, प्रकाश अमृत सावंत, युवराज पंडितराव कांचन, प्रदीप खंडू आहेर, गुलाब भागुजी चौधरी, बाळासाहेब शिवाजीराव पोकळे, अश्विनी सुखदेव भोरडे आणि तेजस नंदकुमार कोकाटे.
वैयक्तिक सभासद प्रतिनिधी : प्रशांत दत्तात्रय काळभोर, महेंद्र पाटीलबुआ दांगट, मधुकर रामदास घुले आणि शेखर सहदेव मस्के.
महिला प्रतिनिधी : सुनीता संदीप धुमाळ आणि सुरेखा अनंता भाडळे.

इतर मागास प्रवर्ग : संजय अमृतराव सातव.
भटक्या-विमुक्त जाती प्रवर्ग : मल्हारी दत्तात्रय केसकर.
अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग : सत्यवान दगडू गायकवाड.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मराठा तरुणांसाठी जरांगेंचा मोठा निर्णय! हेल्पलाईन क्रमांक जारी, थेट केलं आवाहन

Thursday, 12 November 2026, 23:00

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! रब्बी पीक विमा नोंदणी सुरू; 31 मार्चपर्यंत संधी, पाहा कोणत्या पिकांसाठी किती मुदत?

Thursday, 12 November 2026, 22:25

मैथिली ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या! तक्रार प्राप्त होताच प्रशासनाचा मोठा निर्णय; थेट कारवाईचे आदेश!

Thursday, 12 November 2026, 22:05

उरुळी कांचन-आष्टापूर रस्त्यावर उभ्या ऊस ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक ; उरुळी कांचन जवळील तरुणाचा जागीच मृत्यू..

Thursday, 12 November 2026, 21:51

तलाठ्यासह स्वतःसाठी मागितली लाच; 7/12 च्या नोंदीसाठी 20 हजारांचा सौदा, महिला अधिकारी ACBच्या ताब्यात!

Thursday, 12 November 2026, 20:33

हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत अनेक मातब्बरांनी घातले लक्ष, सर्वच पक्षीय मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!

Thursday, 12 November 2026, 20:22
Next Post

तलाठ्यासह स्वतःसाठी मागितली लाच; 7/12 च्या नोंदीसाठी 20 हजारांचा सौदा, महिला अधिकारी ACBच्या ताब्यात!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp