Thursday, August 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रिक्षावाल्या बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याचा खून! पतीची हत्या करून मृतदेहाचे छोटे-छोटे तुकडे डोंगरदरीत फेकले; 11 महिन्यांनी समोर आलं धक्कादायक सत्य

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 13 July 2026, 16:27

मुंबई: महाराष्ट्रात सध्या गुन्हेगारीच्या घटनांनी चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. केतन अग्रवाल प्रकरणाची चर्चा विरते न विरते तोच, नवी मुंबईच्या ऐरोलीतून एक भीषण घटना समोर आली आहे. एका पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. केवळ पती अडसर ठरत होता, म्हणून या महिलेने हत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

या प्रकरणात सुनिता कुशवाह (वय 40) आणि तिचा साथीदार राहुल प्रजापती (वय 30) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बलीराम कुशवाह (वय 50) असे मृत पतीचे नाव होते. सुनिता आणि  रिक्षाचालक राहुल यांच्यात अनैतिक संबंध होते. या नात्याबद्दल बलीराम यांना समजल्यानंतर त्यांनी त्याला कडाडून विरोध केला होता. पतीचा हा विरोधच त्यांच्या जीवावर बेतला. सुनिताने राहुलच्या मदतीने पतीला कायमचे संपवण्याचा कट रचला.

9 ऑगस्ट 2025 रोजी घरी मुले नसल्याचा फायदा घेत, या दोघांनी बलीराम यांचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे तीन तुकडे करून ते गवळी देव डोंगर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी टाकले. इतकेच नाही, तर त्यानंतर सुनिताने घर बदलले आणि भावाने विचारणा केल्यावर पती सोडून गेल्याची थाप मारली. तब्बल 11 महिने तिने हे सत्य लपवून ठेवले होते. एप्रिल 2026 मध्ये बलीराम बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांचा तपास सुरू झाला.

पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांचा वापर करत राहुलच्या कॉल डिटेल्सवर लक्ष केंद्रित केले. वारंवार बदललेले मोबाईल आणि संशयास्पद वागणूक यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि चौकशीअंती दोघांनीही गुन्हा कबूल केला. सध्या पोलीस डोंगराळ भागात मृतदेहाचे अवशेष शोधत आहेत, जे 11 महिन्यांनंतर शोधणे एक मोठे आव्हान बनले आहे. रबाळे एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

MPSC उमेदवारांना दिलासा! गट-क पूर्व परीक्षेच्या अर्जाला मुदतवाढ; 5,707 पदांसाठी आणखी संधी

Wednesday, 5 August 2026, 23:03

मंत्रिपद जाणार? संजय शिरसाटांसह आणखी 3 मंत्र्यांवर टांगती तलवार,नेमकं काय प्रकरण?

Wednesday, 5 August 2026, 22:44

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा भडकला! 4 लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे अवैध,राजकीय वर्तुळात खळबळ

Wednesday, 5 August 2026, 21:38

तुकाराम महाराजांच्या पालखीच्या परती प्रवासात यवतकरांचा भक्तीभाव! वारकऱ्यांसाठी चपाती-भाजीचा नेवैद्य

Wednesday, 5 August 2026, 21:18

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला वेग! अनिल काकोडकरांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन,राज्य सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 5 August 2026, 21:06

15 ऑगस्टला शाळांमध्ये कवायत संचलन! विद्यार्थ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आदेश,दुमदुमणार देशभक्तीचा जयघोष

Wednesday, 5 August 2026, 20:37
Next Post

पुण्यात मध्यरात्री महिलेसोबत घडलं भयंकर! खराडी बायपासवर कार पार्क केली; अचानक खिडकीच्या काचेवर हल्ला झाला अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.