मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर सौरव जोशी सध्या त्याच्या एका व्लॉगमुळे चर्चेत आला आहे. पत्नी अवंतिका भट्ट हिला पाळीव कुत्रा ‘ओरिओ’ याच्या पाण्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचं चॅलेंज दिल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. काही नेटकऱ्यांनी या प्रकाराला केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी केलेला स्टंट म्हटलं, तर काहींनी पत्नीशी अशा प्रकारे वागण्यावर प्रश्न उपस्थित केले.

हा प्रकार सौरव आणि अवंतिका ‘ट्रुथ ऑर डेअर’ हा खेळ खेळत असताना घडल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं. सुरुवातीला अवंतिकाने हे चॅलेंज स्वीकारण्यास नकार दिला. मात्र, सौरवने तिला आग्रह केला. भांड्यातील पाणी स्वच्छ असल्याचं सांगत त्याने किमान एक घोट तरी पिण्याची विनंती केली. अखेर अवंतिकाने पाणी प्यायल्यानंतर हा प्रसंग चर्चेचा विषय ठरला.

नेटकऱ्यांनी का केली टीका?
व्हिडीओमधील हा प्रसंग पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी सौरवच्या कृतीवर आक्षेप घेतला. काहींनी पत्नीला अशा प्रकारचं चॅलेंज देणं अयोग्य असल्याचं म्हटलं. तर काही प्रेक्षकांनी मनोरंजनासाठी कोणत्या मर्यादा पाळल्या पाहिजेत, असा प्रश्न उपस्थित केला. या चर्चेमुळे सोशल मीडियावर सौरवच्या व्लॉगची मोठी चर्चा सुरू झाली.

ट्रोलिंगनंतर सौरव जोशीचं स्पष्टीकरण
टीका वाढल्यानंतर सौरवने त्याच्या दुसऱ्या व्लॉगमध्ये या घटनेबाबत भूमिका मांडली. त्याच्या म्हणण्यानुसार, अवंतिकाने ज्या भांड्यातून पाणी प्यायलं, ते भांडं आधी स्वच्छ धुतलं होतं. त्यांच्या घरी पिण्यासाठी वापरलं जाणारं अल्कलाइन पाणीच पाळीव कुत्रा ओरिओ यालाही दिलं जातं, असं त्याने स्पष्ट केलं.
पाळीव प्राणी कुटुंबाचाच एक भाग असतात, असं सांगताना सौरवने ओरिओसोबत अनेकदा जेवण आणि ताट शेअर केल्याचाही उल्लेख केला. त्याच्या मते, हा प्रकार ‘ट्रुथ ऑर डेअर’ खेळाचा भाग होता. मात्र, त्याच्या स्पष्टीकरणानंतरही काही नेटकऱ्यांनी या चॅलेंजवर नाराजी व्यक्त केली.







