Saturday, October 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भाजपच्या पुणे पदवीधारच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आहेत कोण? काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याशी आहे खास नातेकाँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याशी आहे खास नाते

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 4 October 2026, 14:07

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने धक्कातंत्राचा अवलंब करत डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या जागेसाठी अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले शरद लाड यांना डावलण्यात आल्याने भाजपच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसचे नेते सतेज पाटील हे डॉ. स्मिता जाधव यांचे नात्याने मामा असल्याने भाजपच्या या निर्णयाला वेगळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. काँग्रेस नेत्याच्या भाचीला उमेदवारी देऊन भाजपने पश्चिम महाराष्ट्रात नेमके कोणते राजकीय समीकरण साधले आहे, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा परंपरेने भाजपशी जोडली जाते. यंदाही महायुतीत ही जागा भाजप लढवणार असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे या मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी भाजपमध्ये अनेक इच्छुकांनी तयारी केली होती. शरद लाड यांच्यासह अन्य काही नावांचीही चर्चा सुरू होती. मात्र, अखेर पक्षाने डॉ. स्मिता जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीत असलेल्या इच्छुकांना धक्का बसला आहे.

डॉ. स्मिता जाधव या शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व असून, त्यांचा डॉ. डी. वाय. पाटील समूहाशी संबंध आहे. त्या पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलपती म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठांतर्गत विविध शैक्षणिक संस्था कार्यरत असून, या संस्थांमधून 25 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक उपक्रम पोहोचत असल्याची माहिती त्यांच्या परिचयात देण्यात आली आहे.

डॉ. स्मिता जाधव यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून शिक्षणशास्त्र विषयात पीएच.डी. प्राप्त केली आहे. तसेच वित्तीय व्यवस्थापन विषयात एमबीए आणि संगणकशास्त्र विषयात अभियांत्रिकी पदवी घेतली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमही पूर्ण केला आहे. उच्च शिक्षणात डिजिटल प्रणालींचा वापर, शैक्षणिक संस्थांचे व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांना भविष्याभिमुख शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिल्याचे त्यांच्या शैक्षणिक कार्यातून दिसून येते.

 

शैक्षणिक क्षेत्राबरोबरच त्यांनी माध्यम आणि सामाजिक क्षेत्रातही विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्या पुढारी पब्लिकेशन प्रा. लि.च्या संचालिका, टोमॅटो 94.3 एफएम आणि आपला एफएम 91.9 च्या कार्यकारी संचालिका आहेत. तसेच 16 हजारांहून अधिक महिलांचा सहभाग असलेल्या कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा म्हणूनही त्या कार्यरत आहेत. महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम राबविणे या क्षेत्रांत त्यांनी काम केले आहे.

सतेज पाटील यांच्याशी नातेसंबंधामुळे राजकीय चर्चांना उधाण
डॉ. स्मिता जाधव यांचे काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याशी असलेले नातेसंबंध या उमेदवारीमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. भाजपने काँग्रेस नेत्याच्या भाचीला उमेदवारी दिल्याने या निर्णयामागे पश्चिम महाराष्ट्रातील व्यापक राजकीय समीकरणांचा विचार आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. मात्र, उमेदवारी देण्यामागील पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नाही.

दरम्यान, शिक्षण क्षेत्रातील अनुभव, संस्थात्मक नेतृत्व आणि सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असलेल्या डॉ. स्मिता जाधव यांना भाजपने दिलेली संधी पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीला नवे वळण देणारी ठरू शकते. शरद लाड यांच्यासह इच्छुकांना डावलून घेतलेला हा निर्णय पक्षांतर्गत राजकारणात कोणते पडसाद उमटवतो आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर त्याचा काय परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

दुष्काळाने घेतला शेतकऱ्याचा बळी?आत्महत्या करून जीवन संपवलं ; चिठ्ठीतून मांडली काळीज पिळवटून टाकणारी व्यथा!

Friday, 9 October 2026, 22:50

पूर्णेकर मृत्यू प्रकरणात महत्वाची अपडेट ! मुख्य आरोपी ‘टल्ली’ प्रयागराजमध्ये जेरबंद; ठाणे क्राइम ब्रँचची धडाकेबाज कारवाई

Friday, 9 October 2026, 22:10

महापौरांच्या ‘लाईक-शेअर’साठी २५ लाखांचा खर्च! मुंबईत नवा वाद पेटला; शिंदेसेनेसह विरोधक आक्रमक

Friday, 9 October 2026, 21:53

अशोक खरातच्या अडचणी वाढल्या! आर्थिक फसवणूक प्रकरणात 14 दिवसांची जेलवारी; कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 9 October 2026, 21:02

पुण्यात शिक्षक-पदवीधर निवडणुकीचा रणसंग्राम! कोणत्या पक्षाकडून कोण मैदानात? जाणून घ्या संपूर्ण लढतीचं चित्र

Friday, 9 October 2026, 20:34

लोणी काळभोर येथील अंकुर बाल रुग्णालयाचे संचालक डॉ. नितीन वाघमारे यांना मातृशोक

Friday, 9 October 2026, 20:10
Next Post

पुण्यात भावा-बहिणीचं विकृत कृत्य! गरोदर महिलेचे केस पकडले, पोटात लाथ मारली जागेवरच रक्तस्त्राव सुरु झाला अन्....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp