लोणी काळभोर, (पुणे) : थेऊर (ता.हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असल्याच्या कारणाने लोणी काळभोर (ता. हवेली) येथील शनिवारी (ता. ९) भरणारा आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्रियांका काळभोर यांनी दिली.
यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक शनिवारी पार पडत आहे. या निवडणुकीचे मतदान लोणी काळभोर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे बाजारात शेतकरी, विक्रेते, व्यापारी, नागरिकांची मोठी गर्दी असते. या गर्दीच्या अनुषंगाने शनिवारी आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, परिसरातील शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी, ग्राहकांनी बाजारामध्ये गर्दी करू नये व विशेष करून शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल शनिवारच्या लोणी काळभोर बाजारामध्ये विक्रीसाठी आणू नये, असे निवेदन ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आले आहे.