Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News: उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा उरुळी कांचनमधील दौरा नागरिकांच्या मुळावर

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 22 March 2026, 17:00

लोणी काळभोर, ता. 22 : देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या दौऱ्यासाठी केलेल्या अतिशय (Uruli Kanchan News) कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे रविवारी (ता.22) पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गासह उरुळी कांचन आणि लोणी काळभोर (ता. हवेली) परिसरातील अंतर्गत रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले. या निर्णयाचा फटका मात्र थेट सर्वसामान्य नागरिक आणि हजारो विद्यार्थ्यांना बसला असून, प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. (Latest Marathi News)

उरुळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमाचा स्थापना दिन सोहळा व “सिक्रेट्स ऑफ अवर हॅपिनेस” या पुस्तकाचे प्रकाशनासाठी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आले होते, तर त्याच वेळी लोणी काळभोर येथील एमआयटी शैक्षणिक संकुलात पोलीस भरतीची परीक्षा देण्यासाठी तब्बल 5 हजारांहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. या दोन्ही मोठ्या कार्यक्रमांचे नियोजन एकाच दिवशी आणि एकाच परिसरात केल्याने वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

रविवारी सकाळी दहापासूनच महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. परीक्षा संपल्यानंतर हजारो विद्यार्थी एकाच वेळी बाहेर पडल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली. बसस्थानकांवर विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती आणि अनेकांना जीव धोक्यात घालून बसच्या दरवाज्याला लटकून प्रवास करावा लागत होता. प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी कोणतीही पर्यायी वाहतूक व्यवस्था न केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

दरम्यान, उपराष्ट्रपतींच्या सुरक्षेच्या कारणास्तव उरुळी कांचन परिसरातील अंतर्गत रस्ते बंद करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या घराजवळ पोहोचण्यासही अडचणी निर्माण झाल्या. अनेक ठिकाणी पोलिसांनी वाहनधारकांना “गाडी इथेच लावा आणि पायी जा” असे सांगितल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. महागडी वाहने रस्त्यावर सोडून जाण्याची भीती असल्याने अनेकजण तासनतास गाड्यांमध्येच अडकून बसले.

या संपूर्ण घटनेत पोलिस आणि प्रशासनाची नियोजन क्षमता पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून आले. एका बाजूला व्हीआयपींच्या सुरक्षेला प्राधान्य देताना दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिकांचे हाल होत असल्याचे चित्र स्पष्टपणे समोर आले. व्हीआयपी संस्कृतीमुळे सामान्यांना का त्रास सहन करावा लागतो? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

प्रशासनाचा नियोजनात सपशेल अपयश
उपराष्ट्रपतींचा दौरा आणि हजारो विद्यार्थ्यांची परीक्षा या दोन्ही गोष्टी पूर्वनियोजित असतानाही वाहतूक व्यवस्थेचे कोणतेही ठोस नियोजन करण्यात आले नव्हते. पर्यायी मार्ग, अतिरिक्त बससेवा किंवा टप्प्याटप्प्याने परीक्षा संपवण्यासारख्या उपाययोजना केल्या असत्या तर ही परिस्थिती सहज टाळता आली असती. मात्र प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रविवारी संपूर्ण परिसरात अराजकतेसारखी स्थिती निर्माण झाली.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

Sunday, 29 November 2026, 13:31

पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार? म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी मंगळवारी सोडत; २.७२ लाखांहून अधिक अर्जदार शर्यतीत!

Sunday, 29 November 2026, 13:15

“काळजी घे, आनंदी राहा, लव्ह यू” म्हणत त्यानं अखेरचा व्हिडीओ रेकॉर्ड केला अन् आयुष्य संपवलं; पुण्यात प्रेमप्रकरणाच्या वादातून तरुणाची आत्महत्या

Sunday, 29 November 2026, 12:21

राजगड पोलिसांची कामगिरी; चोरीला गेलेले सोन्याचे दागिने मूळ मालकांना परत!

Sunday, 29 November 2026, 12:11
Next Post
Crime News: The deeds of another fraudster in Maharashtra revealed! He called saying 'Come and wish me a happy birthday'; and then a terrible thing happened to the woman...

Crime News: महाराष्ट्रातल्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड! 'वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला ये' म्हणत बोलावलं; अन् नंतर महिलेसोबत घडलं भयंकर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp