Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा उरुळी कांचन नगरीत दोन तास विसाव्याला थांबणार आहे. उरूळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या भव्य पटांगणावर हा विसावा असणार आहे. (Uruli Kanchan News)
लोणी काळभोर येथील बुधवारचा (दि. १४) मुक्काम उरकून यवतला (दि.१५) मुक्कामासाठी जाणार आहे. त्यावेळी उरूळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या भव्य पटांगणावर वारकरी दोन तास असणार आहेत. असे असताना यापूर्वी उरुळी कांचन गावात पालखी येणार की नाही, याची निश्चिती नव्हती. (Uruli Kanchan News)
मात्र, गावकरी व देहू संस्थान विश्वस्त यांच्यात प्रांत अधिकारी संजय आसवले यांच्यासमोर सामंजस्य झाले. त्यामुळे अखेर पालखी सोहळा विसाव्यासाठी उरुळी कांचनमधील पालखी मार्गाने येत ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरासमोर आरती घेऊन नंतर पुढे जाईल. पालखी महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर दोन तास विसाव्याला थांबणार आहे. त्यानंतर यवत मुक्कामी जाण्यासाठी मार्गस्थ होणार आहे. (Uruli Kanchan News)
दरम्यान, गुरुवारी (दि.१५) दुपारी जगद्गुरू संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा विसाव्यासाठी उरुळी कांचन नगरीत दाखल होत आहे. त्यानुसार, सर्व प्रशासकीय बाबींची पालखी सोहळ्या संदर्भातील तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी पालखी मार्ग व विसावा स्थळाची पाहणी केली. प्रशासनाच्या सर्व तयारीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी नियोजनासाठी पंचायत, महसूल, आरोग्य, पोलिस प्रशासनास कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सूचना दिल्या.
वारकऱ्यांसाठी सुविधा पुरविण्याची तयारी सुरू…
या सोहळ्यात विसावा घेणाऱ्या वारकऱ्यांसाठी नेमलेल्या ठिकाणी ग्रामपंचायत उरुळी कांचनच्या वतीने सुविधा पुरविण्याची तयारी चालू आहे. येथील ग्रामपंचायत, महसुल, आरोग्य, पोलीस प्रशासनाने आवश्यक बाबी पूर्ण करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. चंद्रकांत वाघमारे यांनी विसाव्याच्या ठिकाणी काय सुविधा असाव्यात, याबाबत सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. (Uruli Kanchan News)
महावितरणकडूनही दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याची तयारी…
महावितरणकडून लोणी काळभोर ते उरुळी कांचनपर्यंत आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे. तसेच आरोग्य विभागाकडून वारकऱ्यांसाठी आवश्यक उपचार कक्ष, हिरकणी कक्ष , तसेच आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांचे निर्जंतुकीकरण, औषध फवारणी व इतर खबरदारी घेण्यासाठी उरुळी कांचन आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचिता कदम, डॉ. संदीप सोनवणे व सहकारी प्रयत्न करत आहेत. (Uruli Kanchan News)