Wednesday, June 11, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : हर्ष जगताप शवविच्छेदन (Postmortem) दिंरगाई प्रकरण, प्राथमिक आरोग्य केंद्रातील तीन वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना दिरंगाईबद्दल कारणे दाखवा नोटीसा..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 25 May 2023, 16:48

हनुमंत चिकणे :
उरुळी कांचन (पुणे) : येथील हर्ष जगताप या वीस महिण्याच्या बाळाच्या मृत्युनंतर, उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या गलथान कारभारामुळे मंगळवारी (ता. 23) रोजी तब्बल सात तासाहुनही अधिक काळ त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन (Postmortem)होऊ न शकल्याची धक्कादायक बाब पुढे आली होती. या प्रकरणी दोषी असलेल्या उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या तीन वैधकीय अधिकाऱ्यांना जिल्हा परीषद प्रशासनाने बुधवारी कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. (Uruli Kanchan News)

फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी..

डॉ. सुचिता कदम, डॉ. संदीप सोनवणे व डॉ. नम्रता नंदे ही त्या नोटीसा बजावलेल्या वैधकिय आरोग्य अधिकाऱ्यांची नावे आहेत. उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वरील तीन वैधकिय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्याऐवजी, वरील तीन अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या हवेली पंचायत समितीच्या आरोग्य अधिकाऱ्यासह, डॉ. सुचिता कदम, डॉ. संदीप सोनवणे व डॉ. नम्रता नंदे या तिघांनाही तात्काळ निलंबित करण्याबरोबरच, वरील चौघांच्यावरही फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी उरुळी कांचन ग्रामस्थांनी केली आहे. (Uruli Kanchan News)

तर दुसरीकडे हर्ष जगताप यांच्या मृतदेहाची हेळसांड होण्यास कारणीभुत ठरलेल्या डॉ. सुचिता कदम, डॉ. संदीप सोनवणे व डॉ. नम्रता नंदे या तिनही वैधकिय अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी बरोबरच, वरील तिघांनाही सेवेतुन तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडीचे (पश्चिम महाराष्ट्र) अध्यक्ष विकास जगताप व उरुळी कांचन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अमित कांचन यांनी केली आहे. वरील मागणीसाठी पुढील दोनच दिवसात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेणार असल्याची घोषना विकास जगताप व अमित कांचन यांनी केली आहे. (Uruli Kanchan News)

उरुळी कांचन येथील एका इमारतीच्या पाण्याची टाकीत बुडुन हर्ष जगताप याचा मंगळवारी (ता. 23) रोजी सायंकाळी मृत्यु झाला होता. हर्षच्या नातेवाईकांनी हर्षला उरुळी कांचन येथील प्राथमिक रुग्णालयात नेले. मात्र त्या ठिकाणी एकही डॉक्टर उपलब्द नसल्याने, हर्षचा मृतदेह तीन तासाहुन अधिक काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पडुन होता. या तीन तासाच्या काळात पत्रकार सुनिल जगताप यांच्यासह अनेकांनी डॉक्टरांना फोन करुनही, तीनपैकी एकाही डॉक्टरांनी फोन न उचलल्याने हर्ष जगताप याच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता.

विशेष बाब महिण्याला लाखोंचा पगार घेणारे व उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या डॉ. कदम व डॉ. सोनवणे हे दोघांचीही अधिकृत रजा मंजुर नसतांही दोघेही सुट्टीवर गेले होते. तर त्यांनी परस्पर चार्ज दिलेल्या पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. नम्रता नंदे यांनीही डॉ. कदम व डॉ. सोनवणे या दोघांच्या प्रमानेच बेकायदा दांडी मारल्याचे पुढे आले आहे.

शवविच्छेदन (Postmortem) दिंरगाई प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार- विकासदादा जगताप…

याबाबत बोलताना भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडीचे (पश्चिम महाराष्ट्र) अध्यक्ष विकास जगताप म्हणाले, हर्ष जगताप या चिमुकल्याबाबत मंगळवारी सायंकाळी उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेला प्रकार अतीशय निंदनीय आहे. उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही वैधकिय अधिकारी रजा मंजुर नसतांनाही आठ-आठ दिवस गैरहजर राहतात ही बाब अतीशय निंदनीय व आरोग्य खात्याला काळीमा फासणारी आहे. उरुळी कांचन येथील दोन्ही वैद्यकीय अधिकारी बेकायदा सुट्टीवर असतांना, त्यांच्याजागी आलेला डॉक्टरही गैरहजर राहतो हीबाब त्याहुनही अधिक चिंताजनक आह. यामुळे उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या एकुनच कारभाराची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

इनामगावचे सुपुत्र मुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव…

Wednesday, 11 June 2025, 11:54

हिंजवडीच्या वाहतूक कोंडीने नागरिक हैराण; आयटी पार्क वाहतूक कोंडीत गुरफटले, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Wednesday, 11 June 2025, 11:24

ठाकरेंच्या पक्षातील गळती थांबेना; सोलापुरातील माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा शिवसेनेत प्रवेश

Wednesday, 11 June 2025, 11:18

‘रेल्वे स्थानकावरील स्टॉल्स हटवा, नाहीतर…’ ; मनसेचा प्रशासनाला इशारा

Wednesday, 11 June 2025, 10:58

चाकण: खोलीत डांबून 30 वर्षीय महिलेवर अनेक वेळेस बलात्कार, 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 11 June 2025, 10:50

अवैध गर्भाशय शस्त्रक्रियांना लागणार लगाम; आरोग्यमंत्री आबिटकर यांनी दिला कारवाईचा इशारा

Wednesday, 11 June 2025, 9:43
Next Post

HSC Result | लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचा निकाल ८६.८९ टक्के...

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.