Sunday, May 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कदमवाकवस्तीत जुन्या वादातून दोघांना बेदम मारहाण; चार जणांवर गुन्हा तर दोघांना तत्काळ अटक

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 9 October 2025, 12:03
Two people were brutally beaten up over an old dispute in Kadamwak settlement; Four people were charged and two were immediately arrested

लोणी काळभोर, ता. 9 : जुन्या वादाचा राग मनात धरून दोघांना शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडेवस्ती परिसरात असलेल्या चिंतामणी प्लॉटींगजवळ बुधवारी (ता.8) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत एकजण जखमी झाला आहे. तर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तत्काळ दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

सद्दाम इरफान अन्सारी (वय अंदाजे 21) व अब्दुल ऊर्फ आबु इरफान अन्सारी (वय अंदाजे 23 दोघेही रा. इंदीरानगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आकिब इकबाल अन्सारी (वय अंदाजे 26 रा. इंदीरानगर, कदमवाकवस्ती) व पियुष (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर गणेश सदाफुले असे जखमी झालेल्या तरुणाचे नावे आहे. याप्रकरणी आतीष विनोद झेंडे (वय 18, रा. इंदिरानगर, पाण्याचे टाकीजवळ, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आतीष झेंडे व आरोपी यांच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी भांडणे झाली होती. याचाच राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी आतीष झेंडे याचा मित्र गणेश सदाफुले यास लोखंडी हत्याराच्या मागील बाजुने व लोखंडी रॉडने मारहाण केली. तर आतीष झेंडे यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धमकी दिली. या मारहाणीत गणेश सदाफुले हा जखमी झाला आहे.

याप्रकरणी फिर्यादी आतीष झेंडे याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चारही आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम  118(1),  115 (2),  352,  351(2), 3(5) सह आर्म अॅक्ट कलम  4(25), म.पो. अॅक्ट  37(1) सह  135 क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी सद्दाम अन्सारी व अब्दुल ऊर्फ आबु अन्सारी यांना त्वरित अटक केली आहे. दोन आरोपी फरार झाले असून पोलिसांचे एक पथक आरोपींच्या मागावर आहे.

पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत खड्डा, फुटलेल्या लाईन्स आणि प्रशासनाची उदासीनता ; माजी सरपंच सचिन तुपे यांचा आंदोलनाचा इशारा..

Saturday, 30 May 2026, 20:12

Sex Determination Racket : उरुळी कांचनमधील त्या डॉक्टरवर गुन्हा दाखल ; केडगाव गर्भलिंग निदान रॅकेट भोवलं..

Saturday, 30 May 2026, 19:57

लोणावळ्यातील टायगर पॉईंटवर व्हिडीओ कॉलवर दृश्य दाखवत असताना नौदल जवान 400 फूट दरीत कोसळला..

Saturday, 30 May 2026, 19:23
Loni kalbhor

Loni Kalbhor : “घर तात्काळ खाली कर, नाहीतर तुझा कार्यक्रम करतो” ; कुंजीरवाडीत घरात घुसून मारहाण, तोडफोड प्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल..

Saturday, 30 May 2026, 17:57
Loni kalbhor

Chemical toddy : लोणी काळभोरमध्ये विषारी ‘रासायनिक ताडी’चा पर्दाफाश ; आई-मुलगा जेरबंद, घातक स्फटिक जप्त..

Saturday, 30 May 2026, 17:22

 Positive News : दौंड पोलिसांची सतर्कता अन् माणुसकीचा प्रत्यय; मध्यरात्री सापडलेल्या वृद्ध महिलेला कुटुंबीयांच्याकडे सुखरूप स्वाधीन

Saturday, 30 May 2026, 17:08
Next Post

Worker Death: इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर नेमकं काय घडलं? 3 कामगार अचानक पडले खाली अन् नंतर....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.