पुणे : परराज्यातील विदेशी मद्याची वाहतूक केली जात होती. या विदेशी मद्याची वाहतुक करणाऱ्या कंटेनरसह १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे. ही कारवाई १ जानेवारीला खेड शिवापूर टोल नाक्यावर करण्यात आली. याप्रकरणी दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे.
पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने खेड शिवापूर टोलनाक्यावर एका कंटेनरवर कारवाई केली आहे. वाहनांच्या तपासणी दरम्यान, १ जानेवारी रोजी खेड शिवापुर टोल नाक्यावर संशयित वाहनांची तपासणी सुरु होती. त्यावेळी करत संशयित कंटेनर वाहन क्र. आरजे 30 जीए 3362 हा कंटेनर थांबवून चालकांकडे चौकशी केली, असता सदरच्या वाहनात रंगाचे डबे बाजूला ठेवल्याचे आढळून आले. त्या डब्याच्या पाठीमागे अंदाजे एक हजाराहून अधिक मद्याचे बॉक्स असल्याचे निदर्शनास आले.
हे मद्य फक्त गोवा राज्यात विक्री करत असल्याची माहिती मिळली. कंटेनरसह एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चालकाकडे मद्य वाहतुकीच्या संदर्भातील कोणताही वाहतूक पास, परवाना अगर कोणतीही कागदपत्रे मिळून आलेले नाही. याप्रकरणी दोन आरोपीना अटक करण्यात आले असून पुढील तपास निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग यांचे कार्यालयामार्फत सुरू आहे
राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई आयुक्त विजय सूर्यवंशी, मा. संचालक (अंमलबजावणी व दक्षता) सुनील चव्हाण यांच्या आदेशाने पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक चरण सिंग राजपूत, उपअधीक्षक संजय आर पाटील, युवराज शिंदे, एस. बी. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग या पथकाने केली.