Saturday, June 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड उपजिल्हा रुग्णालयाचा कायापालट; आता पुण्याकडे धाव घेण्याची गरज नाही, अत्याधुनिक आरोग्य सेवा घरच्या दारी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 26 June 2026, 15:41

पुणे: दौंड शहर आणि तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 50 खाटांवरून 100 खाटांपर्यंत श्रेणीवर्धन करण्यात आलेल्या दौंड उपजिल्हा रुग्णालयासाठी राज्य शासनाने 49 नवीन नियमित पदांच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. यामुळे रुग्णालय लवकरच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, विस्तारित रुग्णालयाच्या इमारतीचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. यापूर्वी या इमारतीच्या बांधकामासाठी 33 कोटी 52 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

नव्या मंजूर पदांमध्ये बधिरीकरण तज्ज्ञ, अस्थिव्यंग तज्ज्ञ, नेत्रशल्य चिकित्सक, दंतचिकित्सक, अपघात कक्ष वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, परिसेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, भौतिकोपचार तज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, कक्षसेवक, शस्त्रक्रियागृह परिचर, सफाईगार तसेच प्रशासकीय आणि लिपिक वर्गातील विविध पदांचा समावेश आहे.

 

या पदभरतीमुळे रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढणार असून रुग्णांना स्थानिक पातळीवर अधिक दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

यापूर्वी गंभीर आजार, अपघात किंवा शस्त्रक्रियांसाठी दौंड तालुक्यातील रुग्णांना पुणे किंवा इतर शहरांमध्ये जावे लागत होते. मात्र, रुग्णालयाची क्षमता वाढल्याने आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने नागरिकांना अनेक उपचार आता स्थानिक स्तरावरच मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आमदार राहुल कुल यांच्या या यशस्वी पाठपुराव्याबद्दल दौंड तालुक्यातील नागरिकांमधून व रुग्णांमधून मोठे समाधान व्यक्त होत असून त्यांचे आभार मानले जात आहेत.

“दौंड तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यंत उत्तम आरोग्य सुविधा पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. ३३ कोटी ५२ लाख रुपये खर्चून उभारली जाणारी सुसज्ज इमारती पूर्ण होत आली आहे, आणि आता ४९ नवीन पदे मंजूर झाल्यामुळे रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार मिळतील. लवकरच या विस्तारित रुग्णालयाचे लोकार्पण करून ते जनतेच्या सेवेत समर्पित केले जाईल.”
— आमदार राहुल कुल (दौंड विधानसभा मतदारसंघ)

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

TET उमेदवारांसाठी मोठी बातमी: परीक्षा रद्द; पुन्हा नोंदणी किंवा शुल्क भरण्याची गरज नाही

Saturday, 27 June 2026, 18:52

शाळेत शिक्षण की धोकादायक काम? शिडीवर चढवून विद्यार्थ्यांकडून स्वच्छता; बारामतीतील पालकांचा गंभीर आरोप

Saturday, 27 June 2026, 18:33

Sasavad News : धूळ खात पडलेल्या 65 बेवारस वाहनांच्या मालकांचा सासवड पोलिसांनी लावला शोध; 8 दिवसांत ताबा न घेतल्यास होणार लिलाव -पोलीस निरीक्षक संतोष घोळवे..

Saturday, 27 June 2026, 18:23

सोरतापवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात देवदर्शनासाठी निघालेल्या महिलेला दुचाकीस्वाराने उडवले; दुचाकीचालकावर गुन्हा दाखल..

Saturday, 27 June 2026, 18:16

इंस्टाग्रामवर भेटला, लग्नाचं आमिष दाखवलं, महागडे कपडे अन् दागिने पाठवत गंडवलं; सांगवीतल्या महिलेची ५ लाखांची फसवणूक

Saturday, 27 June 2026, 17:57

शिंदवणे येथे छुप्या पद्धतीने देशी दारू विकणारा तरुण जेरबंद

Saturday, 27 June 2026, 17:52
Next Post

ओतूरमधील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला 3 वर्ष कारावासाची शिक्षा; जुन्नर न्यायालयाचा निकाल; महिनाभरातील दुसऱ्या शिक्षेमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.