Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sasavad News : धूळ खात पडलेल्या 65 बेवारस वाहनांच्या मालकांचा सासवड पोलिसांनी लावला शोध; 8 दिवसांत ताबा न घेतल्यास होणार लिलाव -पोलीस निरीक्षक संतोष घोळवे..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 27 June 2026, 18:23

सासवड, (पुणे) : सासवड पोलिसांनी ‘गंगामाता वाहन शोध संस्थेच्या’ मदतीने पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेल्या तब्बल 65 बेवारस वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेण्यास यश मिळवले आहे. संबंधित वाहन मालकांनी येत्या आठ दिवसांच्या आत आपल्या वाहनांची मूळ कागदपत्रे दाखवून गाड्या ताब्यात घ्याव्यात, असे आवाहन सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी केले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सासवड पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक वर्षांपासून 65 वाहने बेवारस आणि जप्त रेकॉर्डवरील म्हणून धूळ खात पडलेली होती. ही वाहने ऊन, वारा आणि पाऊस यामुळे गंजून गेली असून त्यांची मोठी झीज झाली होती. अनेक वाहनांचे रजिस्ट्रेशन नंबर, चेसीस नंबर आणि इंजिन नंबर गंजल्यामुळे ते वाचणे कडक अवघड झाले होते.या वाहनांमुळे पोलीस ठाण्याच्या आवारात घाण आणि दुर्गंधी पसरून पोलिसांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

या पार्श्वभूमीवर वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार या बेवारस वाहनांचा शोध घेऊन ती मूळ मालकांच्या कडक ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सासवडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे, पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे आणि मुद्देमाल कारकून पोलीस हवादार नंदकुमार फडतरे यांचे एक पथक नेमण्यात आले.

या पथकाने परंदवाडी, तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) येथील महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या ‘गंगामाता वाहन शोध संस्थेचे’ अध्यक्ष श्री. राम उदावंत व उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे यांची माहिती काढून त्यांची मदत घेतली. राम उदावंत यांनी सासवड पोलीस ठाण्यात येऊन सर्व 65 वाहनांची पाहणी केली. गंजलेल्या गाड्यांचे चेसीस नंबर आणि इंजिन नंबर क्रमांकावरून वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) पुणे व पिंपरी चिंचवड येथे पत्रव्यवहार करण्यात आला आणि अखेर या सर्व 65 वाहनांच्या मूळ मालकांचा पत्ता शोधून काढण्यात आला.

 

‘गंगामाता वाहन शोध संस्थेच्या’ मदतीने आता या सर्व वाहन मालकांना सासवड पोलिसांकडून पत्रे पाठवण्यात येत आहेत. पत्र मिळताच संबंधित वाहन मालकांनी सासवड पोलीस ठाण्यात येऊन वाहनाची खात्री करावी आणि मूळ कागदपत्रे दाखवून कडक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आठ दिवसांच्या आत आपली वाहने घेऊन जावीत.

दरम्यान, “संबंधित मालकांनी दिलेल्या मुदतीत आपली वाहने घेऊन न गेल्यास, सासवड पोलिसांकडून या सर्व वाहनांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जाहीर लिलाव केला जाईल. या लिलावातून आलेली सर्व कडक रक्कम शासकीय तिजोरीत भरण्यात येईल!” असा इशारा पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिला आहे.”

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

ढोल-ताशा पथकांना नियमांचा ‘ब्रेक’!पुण्यात 120 ठिकाणी ध्वनिपातळीवर पोलिसांची नजर,आवाजाला लगाम…

Friday, 25 September 2026, 7:43

मान्सूनच पुन्हा जोरदार कमबॅक! मुसळधार पावसाचा हायअलर्ट; गरज असेल तरच घराबाहेर पडा

Friday, 25 September 2026, 7:27

अनंत चतुर्दशीला बाप्पाची खास कृपा! ‘या’ राशींचे नशीब चमकणार; पैसा, नोकरी आणि प्रेमात मोठ्या घडामोडी

Friday, 25 September 2026, 7:12

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06
Next Post

शाळेत शिक्षण की धोकादायक काम? शिडीवर चढवून विद्यार्थ्यांकडून स्वच्छता; बारामतीतील पालकांचा गंभीर आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp