Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात ट्रॅफिक पोलिसांची ‘दंडवसुली’ बंद! ई-चलन मशीनही करून घेतली जमा; नेमकं कारण काय? जाणून घ्या

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 15 August 2026, 8:29

पुणे: पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त असताना पुणे पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईपेक्षा रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याला प्राधान्य द्यावे, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार वाहतूक पोलिसांना 31 ऑगस्टपर्यंत ‘एनफोर्समेंट हॉलिडे’ देण्यात आला आहे.

या काळात सर्व कर्मचाऱ्यांकडील ई-चलन मशीन मुख्यालयात जमा करण्यात आली आहेत. त्यामुळे नियमित दंडवसुलीऐवजी पोलिसांना चौकांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून वाहतूक नियंत्रणाचे काम करावे लागणार आहे. ई-चलनद्वारे कारवाई करण्याचा अधिकार केवळ पोलीस उपनिरीक्षक आणि त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे राहणार आहे.

पावसामुळे पुण्यात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी वाहनांचा प्रवाह सुरळीत करण्यावर भर द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतूक कर्मचारी चौकात उपस्थित आहेत की नाही, तसेच कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत का, याची पाहणी केली जाणार आहे.

चौकातील कॉर्नर पार्किंग, रिक्षांचे अनधिकृत थांबे आणि सिग्नलजवळील डावीकडील मार्ग मोकळा ठेवण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. एखाद्या ठिकाणी मोठी कोंडी झाल्यास संबंधित पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना तातडीने मदतीसाठी पाठवले जाणार आहे.

 

मात्र, मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवरील कारवाई थांबणार नाही. सीसीटीव्ही आणि बॉडी कॅमेऱ्यांच्या मदतीने अशा वाहनचालकांवर कारवाई केली जाईल. गैरप्रकार रोखण्यासाठी डमी डिकॉय पथकाचीही मदत घेतली जाणार आहे.

शहरातील अपघातप्रवण ठिकाणे म्हणजेच ‘ब्लॅक स्पॉट’ शोधून तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची जबाबदारी चौकी प्रमुखांवर देण्यात आली आहे. प्रतिबंधित वेळेत शहरात येणारी जड वाहने बाहेरच थांबवली जातील. याशिवाय रात्रीच्या वेळी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शहरातील 7 परिमंडळांमध्ये विशेष पथके तैनात केली जाणार आहेत. वाहतूक विभागातील 200 नवीन कर्मचाऱ्यांना वाहतूक नियमनाचे विशेष प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post

पुण्यात बड्या ब्रँड्सची ‘अन्नपरीक्षा’! FDAच्या धाडीत धक्कादायक प्रकार; बर्गर किंगचा परवाना रद्द, झेप्टोवरही कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp