Tuesday, May 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘ट्रॅफिक कंट्रोल’ की फक्त दिखावा? पुणे–सोलापूर महामार्गावर कोंडीने नागरिक हैराण; लोणी काळभोर वाहतूक पोलिस सपशेल फेल!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 8 April 2026, 12:14

लोणी काळभोर, ता. 8 : पुणे–सोलापूर महामार्गावर दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूककोंडी आता भीषण स्वरूप धारण करत असून, ती नियंत्रणात आणण्यात लोणी काळभोर वाहतूक पोलिस यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे वास्तव समोर आले आहे. ‘स्मार्ट सिटी’च्या घोषणा केवळ कागदावरच असल्याचे या परिस्थितीतून स्पष्ट होत असून, नागरिकांचा संताप उफाळून आला आहे.

 

बुधवारी (ता. 8) पहाटे महामार्गावर अचानक एक कंटेनर बंद पडल्याने परिस्थिती आणखी बिघडली. कवडी पाट टोल नाका ते थेऊरदरम्यान तब्बल 5 ते 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एका बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. साधारण 10 मिनिटांचा प्रवास तब्बल 45 मिनिटांहून अधिक वेळात पूर्ण करावा लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले.

सकाळी कामावर जाण्याची आणि सायंकाळी घरी परतण्याची वेळ म्हणजे या महामार्गावर अक्षरशः वाहनांचा महापूर उसळतो. किलोमीटरच्या अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. या कोंडीत अडकून शालेय विद्यार्थी, नोकरदार, रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांनाही मोठा विलंब सहन करावा लागत आहे. मात्र, या गंभीर परिस्थितीत वाहतूक पोलिसांची भूमिका केवळ बघ्याची असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

महामार्गावरील अनियोजित पार्किंग, रस्त्यावर उभे असलेले अवजड वाहन, फेरीवाले आणि नियमांचे उघड उल्लंघन करणारे वाहनचालक यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. तरीही यावर ठोस कारवाई करण्याऐवजी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी पोलिसांचा पूर्ण अभाव, तर काही ठिकाणी केवळ नावापुरती उपस्थिती दिसून येते.

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कोणतीही ठोस योजना राबवली जात नसल्याची टीका होत आहे. सिग्नल व्यवस्थापन अपुरे, डायव्हर्जनची योग्य आखणी नाही, तसेच गर्दीच्या वेळेत अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी, दररोज नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकांनाही मार्ग काढणे कठीण जात असल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तरीही प्रशासन आणि वाहतूक विभागाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे.

दरम्यान, “वाहतूक पोलिस नेमके काय करत आहेत?” असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत असून, तातडीने कडक आणि प्रभावी उपाययोजना राबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा, ही वाहतूककोंडी भविष्यात आणखी गंभीर रूप धारण करेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Two people were brutally beaten up over an old dispute in Kadamwak settlement; Four people were charged and two were immediately arrested

Loni Kalbhor Police News : रात्रीच्या ‘ऑल आऊट’ मोहिमेत मोठी कारवाई! रिक्षातून फिरणारे दोघे कोयत्यांसह जेरबंद

Tuesday, 5 May 2026, 18:10
Accident

Loni Kalbhor News : सोलापूर-पुणे महामार्गावर हिट-अँड-रनची धक्कादायक घटना! कामावरून घरी जाताना कामगाराला भरधाव कारची धडक; चालक फरार

Tuesday, 5 May 2026, 17:48

Good News : मोबाईल हरवला… पण 20 मिनिटांत परत! चंदननगर पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेचा आनंद गगनात

Tuesday, 5 May 2026, 17:35
Loni Kalbhor News: Biker dies in accident at Loni Kalbhor

Theur News : थेऊर येथे पेट्रोल टँकरची कारला जोरदार धडक; महिला व चिमुकला गंभीर जखमी

Tuesday, 5 May 2026, 17:25

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये अवैध दारूचा मोठा पर्दाफाश; आई–मुलासह तिघांवर गुन्हा, ३५० लिटर हातभट्टी दारू नष्ट!

Tuesday, 5 May 2026, 17:11

Indapur News : इंदापूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत दोन घरफोड्या, १० लाखांचा ऐवज लंपास!

Tuesday, 5 May 2026, 16:54
Next Post

विनाशाच्या उंबरठ्यावरून जग परतलं! इराणला संपवण्याची भाषा करणाऱ्या अमेरिकेने अचानक का घेतला माघार? वाचा सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.