Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये अवैध दारूचा मोठा पर्दाफाश; आई–मुलासह तिघांवर गुन्हा, ३५० लिटर हातभट्टी दारू नष्ट!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 5 May 2026, 17:11

Loni Kalbhor News लोणी काळभोर, ता. ५ : लोणी काळभोर परिसरात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत अवैध गावठी हातभट्टी दारूचा मोठा साठा उघडकीस आला आहे. कवडीपाट–कदमवाकवस्ती येथील पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या या बेकायदेशीर धंद्यावर पोलिसांनी कारवाई करत तब्बल ३५० लिटर रसायनमिश्रित दारू नष्ट केली असून आई–मुलासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Loni Kalbhor News

अक्षय बजरंग मुळेकर (वय २४) आणि त्याची आई मंदा मुळेकर (वय ४७) व दादा खलसे उरुळी कांचन, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रविण दडस यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Loni Kalbhor News

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक दिगांवर सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास दत्त पार्क परिसरात छापा टाकला. या छाप्यात अक्षय बजरंग मुळेकर आणि त्याची आई मंदा मुळेकर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ३५ लिटर क्षमतेच्या १० प्लास्टिक कॅनमध्ये साठवलेली उग्र वासाची, आरोग्यास अत्यंत घातक अशी गावठी दारू आढळून आली. ही दारू रसायन मिसळून तयार करण्यात येत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. Loni Kalbhor News

पोलिसांनी कॅनमधील द्रवाची पाहणी केली असता त्यातून तीव्र आंबट वास येत होता. ही दारू मानवी आरोग्यास घातक ठरू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. सॅम्पल म्हणून १८० मिली दारू जप्त करून उर्वरित सर्व दारू पंचांसमक्ष जागीच नष्ट करण्यात आली. Loni Kalbhor News

 

दरम्यान, आरोपींनी ही दारू दादा खलसे (रा. ऊरुळी कांचन) याच्याकडून विकत आणल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात तिसऱ्या आरोपीचाही समावेश करण्यात आला असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४, २७५, ३(५) तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई), ५, ६६, ८६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांची धडक मोहीम; नागरिकांत समाधान
लोणी काळभोर परिसरात अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी उचललेल्या या धडक पावलामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या अशा बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! गणेशोत्सवात मध्यवर्ती भागातील ‘हे’ प्रमुख रस्ते जड वाहनांसाठी पूर्णपणे बंद; पोलिसांचा मोठा निर्णय

Thursday, 10 September 2026, 16:04

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! करपलेल्या पिकांचा थेट शेतात जाऊन पंचनामा, सरकारचा मोठा निर्णय

Thursday, 10 September 2026, 16:01

मराठा आरक्षणाच्या लढ्यात अण्णा हजारेंची एंट्री! जरांगेंना दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

Thursday, 10 September 2026, 15:42

‘आम्ही तुम्हाला अटक करायला येतोय’ आज्जीबाईंना तो एक फोन आला अन् पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?

Thursday, 10 September 2026, 15:35

गणेश मंडळांनो सावधान! डीजेचा आवाज मर्यादेपेक्षा वाढला तर थेट कारवाई; पोलिसांचा कडक इशारा

Thursday, 10 September 2026, 15:09

एसडीएम कार्यालयात क्लर्कची नोकरी लावण्याचे आश्वासन दाखवून तरुणीची सुमारे 10 लाखांची फसवणूक, सासवडच्या तरुणावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 14:59
Next Post
Loni Kalbhor News: Biker dies in accident at Loni Kalbhor

Theur News : थेऊर येथे पेट्रोल टँकरची कारला जोरदार धडक; महिला व चिमुकला गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp