Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor Police News : रात्रीच्या ‘ऑल आऊट’ मोहिमेत मोठी कारवाई! रिक्षातून फिरणारे दोघे कोयत्यांसह जेरबंद

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 5 May 2026, 18:10
Two people were brutally beaten up over an old dispute in Kadamwak settlement; Four people were charged and two were immediately arrested

Loni Kalbhor Police News लोणी काळभोर, ता. ५ :  पोलिसांच्या ‘ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन’दरम्यान लोणी काळभोर परिसरात मोठी कारवाई करत दोन संशयितांना कोयते व धारदार शस्त्रांसह रंगेहात पकडण्यात आले. कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडेवस्तीच्या लेन नंबर ७ मध्ये २ मेच्या रात्री ११ ते ३ मेच्या पहाटे २ वाजण्याच्या सुमारास केली आहे. हे दोघे गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत असून, लोणी काळभोर पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळला आहे. Loni Kalbhor Police News

गणेश रघुनाथ बनसोडे (वय 21 घोरपडे वस्ती लेन नं 07, कदमवाकवस्ती ता. हवेली, जि. पुणे ) व अभिजीत दिलीप खर्चे (वय 18 , रा. फ्लॅट नं 102, सैनिक अपार्टमेंट, आष्ठापुर मळा रोड, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार अशोक भागवत गिरी यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलिसांचे विशेष पथक लोणी काळभोर हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती येथील लेन नंबर ७ मध्ये दोन इसम रिक्षामध्ये बसून हातात कोयते घेऊन संशयास्पद हालचाली करत असल्याची गुप्त माहिती मिळाली. वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच संबंधित इसम पळण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पथकाने त्यांना वेढा घालून ताब्यात घेतले. Loni Kalbhor Police News

 

दरम्यान, आरोपी गणेश बनसोडे आणि अभिजीत खर्चे यांच्या ताब्यातील रिक्षाची झडती घेतली असता दोन लोखंडी कोयते आणि एक धारदार पालघन आढळून आले. पोलिसांनी पंचासमक्ष कारवाई करत सुमारे २ लाख ५० हजार रुपयांची बजाज मॅक्सिमा रिक्षा (क्र. एमएच १२ व्हीबी ८७१३) आणि धारदार शस्त्रे जप्त केली. ही शस्त्रे बेकायदेशीररीत्या जवळ बाळगल्याने संबंधितांवर आर्म अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Loni Kalbhor Police News

या कारवाईमुळे परिसरात मोठा गुन्हा घडण्याची शक्यता टळली असून, नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. लोणी काळभोर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपींच्या मागील गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही चौकशी केली जात आहे. Loni Kalbhor Police News

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post
Girl died as drowned in dam water jalgaon

Pune News : फुरसुंगी येथे स्विमिंग पूलमध्ये ९ वर्षाची मुलगी थोडक्यात बचावली; सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरीसह सदस्यांवर गुन्हा दाखल..!; सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरीसह सदस्यांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.