Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : फुरसुंगी येथे स्विमिंग पूलमध्ये ९ वर्षाची मुलगी थोडक्यात बचावली; सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरीसह सदस्यांवर गुन्हा दाखल..!; सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरीसह सदस्यांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 5 May 2026, 18:38
Girl died as drowned in dam water jalgaon

Pune News फुरसुंगी, ता. ५ : भेकराईनगर परिसरातील कुमार पार्क इन्फिनिया सोसायटीमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. स्विमिंग प्रशिक्षणादरम्यान ९ वर्षीय शाश्वती जितेंद्र वाघे ही पूलमधील सक्शन होलमध्ये अडकून बेशुद्ध झाल्याची घटना उघडकीस आली असून, वेळेवर उपचार मिळाल्याने तिचा जीव थोडक्यात वाचला आहे. या प्रकारामुळे सोसायटी व्यवस्थापन आणि मेंटनन्स यंत्रणेच्या हलगर्जीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. Pune News

मिळालेल्या माहितीनुसार, शाश्वती ही २१ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ६.४० वाजण्याच्या सुमारास क्लब हाऊस-२ येथील स्विमिंग पूलमध्ये नियमित प्रशिक्षण घेत होती. यावेळी अचानक ती पूलमधील सक्शन होलमध्ये अडकली. सक्शनच्या तीव्र दाबामुळे ती काही काळ पाण्यात अडकून राहिल्याने बेशुद्ध पडली. या घटनेने पूल परिसरात एकच गोंधळ उडाला.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रशिक्षकांनी तत्काळ प्रसंगावधान राखत मोठ्या प्रयत्नांनी तिला सक्शन होलमधून बाहेर काढले. त्यानंतर तिला तातडीने सीपीआर देण्यात आला. जवळपास शंभर वेळा कॉम्प्रेशन देऊन तिचा श्वास पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर तिला प्रथम भेकराईनगर येथील निलंगेकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी तिला नोबेल रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, शाश्वतीच्या फुफ्फुसात पाणी गेल्याने तिची प्रकृती गंभीर झाली होती. तसेच सक्शनच्या दाबामुळे तिच्या शरीराच्या डाव्या बाजूस दुखापत झाली आहे. सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला.

 

या घटनेतील सर्वात गंभीर बाब म्हणजे स्विमिंग पूलमधील सक्शन होलवर कोणतीही सुरक्षात्मक जाळी बसविण्यात आलेली नव्हती. याशिवाय, प्रशिक्षण सुरू असताना सक्शन पंप सुरू ठेवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या दोन्ही गोष्टींमुळेच हा जीवघेणा प्रकार घडल्याचे समोर येत आहे.

या प्रकरणी शाश्वतीचे वडील जितेंद्र वाघे यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी सोसायटी कमिटीचे चेअरमन, सेक्रेटरी, सदस्य तसेच स्विमिंग पूलच्या देखभालीसाठी नेमलेले व्हेंडर सचिन जयसिंग कुंभार यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे. मुलांच्या सुरक्षेकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर सोसायटीतील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा प्रकारच्या निष्काळजीपणावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. “आज ही घटना घडली, उद्या आणखी कोणाच्या मुलाबाबत असे होऊ नये,” अशी भावना पालक व्यक्त करत आहेत.

पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच, ही घटना स्विमिंग पूलसारख्या सार्वजनिक सुविधांमध्ये सुरक्षेच्या नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव करून देणारी ठरली आहे.

 

 

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post
Loni Kalbhor Crime: A hardened criminal, infamous as 'Chowpatty Raja' in the criminal world, was arrested by Unit 6 of the Crime Branch.

Fursungi News : फुरसुंगी पोलिसांची धडाकेबाज कारवाई! कोबिंग ऑपरेशनमध्ये धारदार शस्त्रासह तरुण जेरबंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.