Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कानिफनाथ घाटात तरुण-तरुणींना लुटणाऱ्या 3 दरोडेखोरांना अवघ्या 12 तासांच्या आत बेड्या; फुरसुंगी पोलिसांची कामगिरी..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 17 June 2026, 16:10

लोणी काळभोर, (पुणे) : कानिफनाथ गडाच्या घाटातील सिटी व्ह्यू पॉईंट परिसरात तरुण-तरुणींवर लाठ्या-काठ्या आणि दगडाने हल्ला करून त्यांना लुटणाऱ्या तीन आरोपींच्या मुसक्या फुरसुंगी पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत आवळल्या.

प्रतिक दिलीप फडतरे (वय 22, धंदा- रसवंतीगृह, रा. मु.पो. बोपगाव, ता. पुरंदर), ओंकार सुनील फडतरे (वय-27, धंदा- शेती, रा. बोपगाव, पुरंदर), गणेश नवनाथ कामठे (वय 27, धंदा- शेती, रा. चांबळी, चिलवाळी वस्ती, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून पोलिसांनी स्प्लेंडर मोटारसायकल आणि लुटलेले मोबाईल असा एकूण 55 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (ता.11) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी तरुण हा त्याचे मित्र आकाश, अथर्व आणि एक मैत्रीण यांच्यासोबत दोन ॲक्टिव्हा दुचाकीवरून कानिफनाथ मंदिराच्या हद्दीतील सिटी व्ह्यू पॉईंट जवळ निसर्ग पाहण्यासाठी आले होते. या वेळी तरुण-तरुणींना रस्त्यात आडवून वरील आरोपींनी हुज्जत घालत लाथाबुक्क्यांनी आणि रस्त्यावरील दगडांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

आरोपींनी फिर्यादी आणि त्याचा मित्र आकाश यांच्याकडून 15 हजार रुपये किमतीचे दोन महागडे मोबाईल हँडसेट आणि ऑनलाईन जबरदस्तीने घेतलेली 13 हजार 300 रुपयांची रोख रक्कम असा एकूण मुद्देमाल धाक दाखवून लुटला आणि अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले होते. या घटनेची फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी तात्काळ गुन्ह्याची गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पथकाला शोध घेण्याच्या सूचना दिल्या.

 

दरम्यान, त्यानुसार पोलीस अंमलदार हेमंत कामथे आणि सागर वणवे यांच्या गोपनीय बातमीदारांनी दिलेल्या माहितीवरून तसेच हवालदार श्रीनाथ जाधव यांनी आरोपींच्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण केले असता, हे तिघेही कानिफनाथ गडाच्या पायथ्याशी बोपगाव येथे लपून बसल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठांच्या आदेशानुसार फुरसुंगी पोलिसांच्या पथकाने कानिफनाथ पायथा, बोपगाव परिसरात वेढा दिला आणि संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

सदरची कामगिरी फुरसुंगी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बापुसाहेब खंदारे सहाय्यक पोलीस फौजदार कदम, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, श्रीनाथ जाधव, सागर वणवे, हेमंत कामथे, योगेश गायकवाड आणि गणेश शिंदे यांनी केली आहे, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार करीत आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post

गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश! महंमदवाडीत धारदार शस्त्रासह तिघे ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp