पुणे: फेब्रुवारी-मार्च महिन्यातील बोर्डाच्या परीक्षांची धामधूम संपल्यानंतर आता राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून निकालाबाबत सुरू असलेल्या तर्कवितर्कांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या ताज्या अपडेटनुसार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) मे महिन्यात लागण्याची शक्यता आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम अंतिम टप्प्यात असून, सध्या गुणांच्या रिपोर्टिंगचे आणि डेटा एंट्रीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात बारावीचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.
दुसरीकडे, दहावीच्या निकालाची प्रक्रियाही वेगात आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर दोन आठवड्यांच्या अंतराने, म्हणजेच मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो.
निकालाची तारीख जवळ येत असताना सोशल मीडियावर अनेकदा अफवा पसरवल्या जातात. विद्यार्थ्यांनी अशा कोणत्याही अनधिकृत तारखांवर विश्वास ठेवू नये. निकाल जाहीर होण्याच्या दोन दिवस आधी बोर्ड अधिकृतपणे वेळ आणि दिनांक जाहीर करते.अधिकृत निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी mahresult.nic.in, mahahsscboard.in खालील संकेतस्थळांना भेट द्यावी.






