Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar Bomb Case : “युट्युबवर पाहून बनवला बॉम्बसदृश (IED) ; उपचारासाठी पैशांची गरज, हॉस्पिटलला खंडणीची धमकी देण्याचा कट उघड, पुणे पोलीस आयुक्तांनी केला मोठा खुलासा..”

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 15 May 2026, 16:44

Hadapsar Bomb Case : पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश वस्तू ठेवून शहरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या आरोपीला अखेर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) नागपूर रेल्वे स्थानकावरून अटक केली आहे. या प्रकरणात दहशतवादी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले असून, आरोपीने वैयक्तिक आर्थिक अडचणीतून आणि उपचारासाठी पैसे उभे करण्याच्या उद्देशाने हा संपूर्ण कट रचल्याचा प्राथमिक तपासातून उलगडा झाला आहे. Hadapsar Bomb Case

शिवाजी राठोड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील आहे. पुण्यातील मांजरी परिसरात त्याचे कपडे आणि बुटांचे दुकान असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी आझाद हिंद एक्सप्रेसने नागपूरमार्गे पुढे नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. नागपूर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर तो उतरताच आधीच सापळा रचून बसलेल्या ATS च्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. Hadapsar Bomb Case

 

या प्रकरणी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, आरोपी 10 मे रोजी वैयक्तिक उपचारासाठी संबंधित हॉस्पिटलमध्ये गेला होता. मात्र उपचारासाठी आवश्यक पैसे नसल्याने त्याने हॉस्पिटलला खंडणीची धमकी देण्याचा कट आखला. आरोपीने युट्युब वरील व्हिडिओ पाहून बॉम्बसदृश वस्तू तयार केली होती. Hadapsar Bomb Case

पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने अवघ्या 400 रुपयांत डिजिटल घड्याळ, चार पाईप, वायर आणि सेलोटेप वापरून बॉम्बसदृश IED तयार केले. मात्र त्यामध्ये कोणतेही स्फोटक पदार्थ नसल्याचे प्राथमिक फॉरेन्सिक तपासात स्पष्ट झाले आहे. आरोपीच्या घरातून डिजिटल टाइमर तसेच सुमारे दोन किलो गांजाही जप्त करण्यात आला आहे. Hadapsar Bomb Case

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. अकोला आणि मूर्तिजापूर येथे शोधमोहीम राबवल्यानंतर नागपूरमध्ये ATS ने ही कारवाई केली. तपासादरम्यान आरोपीने विविध ठिकाणांहून बॉम्बसदृश वस्तू बनवण्यासाठी साहित्य खरेदी केल्याचेही समोर आले आहे. Hadapsar Bomb Case

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले की, “या प्रकरणात कोणताही दहशतवादी अँगल आढळलेला नाही. आरोपी एकटाच होता. त्याची पूर्वी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. सध्या फॉरेन्सिक रिपोर्टची प्रतीक्षा असून तपास प्राथमिक टप्प्यात आहे.” Hadapsar Bomb Case

दरम्यान, आरोपीची बहिण नेपाळमध्ये राहत असल्याने तो नागपूरहून हावडा मार्गे नेपाळला जाण्याच्या तयारीत होता, अशीही माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पुण्यातील हॉस्पिटल सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या रुग्णालयांची सुरक्षा वाढवण्यास सुरुवात केली आहे. Hadapsar Bomb Case

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाची जोरदार एंट्री! पुण्यासह 26 जिल्ह्यांवर पावसाचे सावट; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Thursday, 4 June 2026, 22:21

धक्कादायक! आईच्या बॉयफ्रेंडकडून 4 वर्षाच्या लेकराची निर्घृण हत्या; बेदम मारहाण करून मृतदेह नाल्यात फेकला अन्…

Thursday, 4 June 2026, 21:41

वेष बदलला, नाव बदलले, दाढी, केस वाढवले तरी पोलिसांच्या जाळ्यात सापडला! अटकेनंतर सचिन घायवळचा पहिला फोटो समोर…

Thursday, 4 June 2026, 20:57

भोरचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे 93व्या वर्षी निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Thursday, 4 June 2026, 20:21

18 बळी घेणारा दारू अड्डा जमीनदोस्त! फुगेवाडीत प्रशासनाचा हातोडा; कारवाईला वेग

Thursday, 4 June 2026, 20:17

जुन्नरमध्ये सुरू होता बनावट विदेशी मद्याचा कारखाना; उत्पादन शुल्क विभागाची मोठी धाड; 4 लाखांचे बनावट मद्य जप्त

Thursday, 4 June 2026, 19:39
Next Post

Mumbai News: “BMCतील वादग्रस्त अधिकाऱ्याचा आणखी एक कारनामा? अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नीची 16 कोटींची फसवणूक; महेश पाटील पुन्हा वादाच्या भोवऱ्यात”

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.